Tuesday, October 20, 2026
Homeगडचिरोली५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या १ हजार १८३ ग्रंथांच्या यादीबाबत सूचना व...

५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या १ हजार १८३ ग्रंथांच्या यादीबाबत सूचना व हरकती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान, कोलकाता व राज्य शासन यांच्या संयुक्त निधीतून राबविण्यात येणाऱ्या ५१ व्या ग्रंथभेट योजनेसाठी निवडलेल्या १ हजार १८३ ग्रंथांची यादी ग्रंथालय संचालनालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.या यादीबाबत सूचना,हरकती अथवा आक्षेप ३१ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत नोंदविता येणार आहेत.
सन २०२४ मध्ये प्रकाशित व ग्रंथालय संचालनालयास प्राप्त झालेल्या ग्रंथांपैकी राज्य ग्रंथालय नियोजन समितीच्या उपसमिती सदस्यांनी या ग्रंथांची निवड केली आहे.यामध्ये मराठीतील ६८५,हिंदीतील २४६ आणि इंग्रजीतील २५२ ग्रंथांचा समावेश आहे.ही यादी “www.dol.maharashtra.gov.in” (https://www.dol.maharashtra.gov.in)या संकेतस्थळावर १६ ते ३१ ऑक्टोंबर २०२६ या कालावधीत अवलोकनासाठी उपलब्ध आहे.
यादीतील कोणत्याही ग्रंथाबाबत सूचना,हरकती किंवा आक्षेप असल्यास,तसेच ग्रंथाचे नाव,लेखक,प्रकाशक व किंमत यामध्ये दुरुस्ती आवश्यक असल्यास, संबंधितांनी ३१ ऑक्टोंबरपर्यंत ग्रंथालय संचालक,ग्रंथालय संचालनालय,महाराष्ट्र राज्य,नगर भवन, मुंबई–४००००१ या पत्त्यावर लेखी स्वरूपात कळवावे.मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या सूचनांचा विचार केला जाणार नसल्याचे शासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा संदेश आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ऐतिहासिक धम्मक्रांतीच्या स्मृतींना उजाळा देणारा ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा...

सामाजिक बांधिलकी जपणारे चोप येथील तिलक गायकवाड यांचा सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळातर्फे सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या डिजिटल वाटचालीत महत्त्वपूर्ण योगदान देणारे देसाईगंज तालुक्याच्या चोप येथील तिलक गायकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.तिलक गायकवाड...

आता अनुदानित खतांचे मोबाईलवरून होणार बुकिंग; बुकिंगनंतर तीन दिवसांत खत खरेदीची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील खत विक्री प्रक्रिया अधिक पारदर्शक,सुलभ आणि सुव्यवस्थित करण्यासाठी रब्बी हंगाम २०२६ मध्ये येत्या,गुरुवार २२ ऑक्टोंबर पासून ‘एफएफएस’(फार्मर फर्टिलायझर सिस्टीम)ही डिजिटल...

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेच्या अटींमध्ये सुधारणा.. -आता पात्र विद्यार्थ्यांना दहा महिन्यांसाठी ३८ ते ४३ हजार रुपये अर्थसहाय्य..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उच्च शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!