Friday, April 17, 2026
Homeगडचिरोली३४ वर्षीय जवानाचा नक्षलविरोधी अभियानावर जाताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

३४ वर्षीय जवानाचा नक्षलविरोधी अभियानावर जाताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील फुलनार जंगल परिसरात माओवाद्यांविरोधात मोठी कारवाई करत सी-६० जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त केला.मात्र,कारवाईदरम्यान महेश नागुलवार यांना गोळी लागली आणि उपचारादरम्यान त्यांचे मंगळवारी ११ फेब्रुवारीला निधन झाले. नक्षलवाद्यांविरोधात कारवाई करतांना वीरगती प्राप्त झालेले सी-६० कमांडो महेश नागुलवार यांच्यावर काल बुधवार १२ फेब्रुवारीला त्यांच्या गावी अनखोडा (ता.चामोर्शी) येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले.सदरची घटना ताजी असतांनाच एका ३४ वर्षीय जवानाचा नक्षलविरोधी अभियानावर पथकासह जात असतांना वाटेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना काल,बुधवारी १२ फेब्रुवारीच्या सायंकाळी ६.३० ते ७ वाजेच्या दरम्यान घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.रवीश मधुमटके रा.गडचिरोली असे मृत्यू झालेल्या जवानाचे नाव आहे.
माहितीनुसार,काल बुधवारी भामरागड तालुक्यात नक्षलविरोधी अभियानाकरिता रोड ओपनिंग करण्यासाठी आपल्या पथकासह ते रवाना झाले. दरम्यान कोठी पोलिस मदत केंद्रापासून पाच किलोमीटर अंतर चालल्यानंतर रवीश यांना अस्वस्थ वाटू लागले.त्यांना भामरागड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले.मात्र,डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केल्याचे पोलिसांनी सांगितले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा; प्रथम बक्षीस ३१ हजार रुपये..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्य,रोजगार व उद्योजकता,नाविन्यता विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती प्रीत्यर्थ राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.या स्पर्धेत राज्यभरातील विद्यार्थी...

कामगारांसाठी दिलासादायक निर्णय; आता गोण्यांचे वजन राहणार ५० किलोपर्यंतच..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-डोक्यावर,पाठीवर ओझे वाहून नेणारे, अंगमेहनतीची कामे करणारे कामगार म्हणजेच माथाडी(हमाल)कामगारांना दररोज जड गोण्या(पोते) उचलण्याचे काम करावे लागते.धान,कांदा,बटाटा आणि इतर शेतमालाच्या व्यवहारात अनेक...

आज प्रोजेक्ट ‘उडान’ अंतर्गत १ हजार २७८ युवकांना रोजगार.. -नक्षलवाद विरोधी अभियानासाठी ३१ चारचाकी वाहनांचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधुनिक युगाच्या बदलत्या गरजेनुसार युवकांनी शिक्षणासोबत तांत्रिक कौशल्य आत्मसात करून स्वतःमध्ये आवश्यक बदल घडवून आणावेत, असे आवाहन राज्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

चार शाळकरी मुलांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-शाळेची सुट्टी झाल्यानंतर घराकडे परतणाऱ्या चार अल्पवयीन शाळकरी मुलांनी रत्याच्या कडेला असलेल्या मार्गावरील खड्ड्यातील पाण्यात उतरून आंघोळ करत असतांनाच खोल पाण्याचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!