Friday, October 23, 2026
Homeगडचिरोली२७ वर्षीय तरुणाची नक्षल्यांनी केली हत्या-गडचिरोली जिल्ह्यातील घटना…..

२७ वर्षीय तरुणाची नक्षल्यांनी केली हत्या-गडचिरोली जिल्ह्यातील घटना…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्ह्याच्याभामरागड तालुक्यात पेनगुंडा येथे बुधवारी रात्री नक्षलवाद्यांनी एका तरुणाची हत्या केल्याने जिल्ह्यात नक्षलवादी पुन्हा सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे.भामरागड तालुक्यातील धोडराज पोलिस मदत केंद्राच्या हद्दीत पेनगुंडा गावात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.त्यासाठी दिनेश पुसू गावडे वय २७ वर्षे रा.लाहेरी ता.भामरागड हा लाहेरीवरून १५ नोव्हेंबरला पेनगुंडा येथे गेला होता.रात्री बंदुकधारी नक्षल्यांनी गावात प्रवेश करून गावाबाहेर नेले.त्याठिकाणी तीक्ष्ण हत्याराने हत्या केली.हत्येनंतर नक्षल्यांनी दिनेशनच्या मृतदेहाजवळ पत्रक टाकले.त्यामध्ये दिनेश हा पोलिस खबऱ्या असल्याचा आरोप नक्षल्यांनी केला आहे.गुरुवारला सकाळच्या सुमारास दिनेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी भामरागड तालुका मुख्यालयात आणण्यात आला.पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून या भागात नक्षलविरोधी अभियान तीव्र करण्यात आले आहे.

गडचिरोली जिल्हा पोलिस अधीक्षक – नीलोत्पल 👇

दिनेश हा पोलिसांचा खबरी नसून सामान्य माणूस होता.पेनगुंडा येथे आयोजित क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी तो गेला होता. त्याठिकाणी नक्षलवाद्यांनी त्याला पकडले आणि पोलिस खबऱ्या असल्याचा आरोप करून त्याची हत्या केली.निष्पाप लोकांची हत्या करून नक्षलवादी दहशत पसरवीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

शेतकऱ्यांच्या मदतीला धावून आले आमदार विजय वडेट्टीवार.. – थकाबाई तलावातून पाणी सोडण्याचा मार्ग मोकळा; १३५ कोटींच्या सिंचन निधीचीही घोषणा..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम ​सिंदेवाही(चंद्रपूर):-धानाचे पीक अंतिम टप्प्यात असतांना सिंचनासाठी पाण्याची तीव्र गरज निर्माण झाल्याने सिंदेवाही तालुक्यातील शेतकरी संकटात सापडले होते.शेतकऱ्यांची ही बिकट परिस्थिती लक्षात...

आंधळी-नवरगाव येथे जिल्हा परिषद अधिकाऱ्यांची भेट; गावातील समस्यांचा घेतला आढावा -बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या निवेदनाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी काळजी प्रकल्पांतर्गत आयोजित बालग्रामसभा व बालसंरक्षण समितीच्या माध्यमातून कुरखेडा तालुक्याच्या आंधळी नवरगाव येथील नागरिकांनी मांडलेल्या बससेवा,शिक्षण,आरोग्य...

कराळे मास्तरांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातून हकालपट्टी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघाची उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यामध्ये नागपूर पदवीधर मतदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!