Tuesday, September 22, 2026
Homeभामरागड२६ वर्षीय निष्पाप मुलाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून केली हत्या- भामरागड तालुक्यातील मर्दहूर...

२६ वर्षीय निष्पाप मुलाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून केली हत्या- भामरागड तालुक्यातील मर्दहूर गावातील घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली (भामरागड) :- तालुक्यातील मर्दहूर गावातील २६ वर्षीय निष्पाप मुलाची नक्षल्यांनी गोळ्या झाडून हत्या केल्याने मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून आई- वडील व दोन भावंडांनी टाहो फोडला.आमच्या निष्पाप लेकराची काय चूक.त्याला का म्हणून मारले, असे म्हणत आई-वडिलांसह नातेवाइकांनी एकच आक्रोश केला.त्यामुळे भामरागड ग्रामीण रुग्णालय परिसरातील वातावरण सुन्न झाले होते.

सदर घटना ९ मार्च २०२३ रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास तीन नक्षली वेशभूषेत आले.शेतात काम करीत असतांना बोलण्यासाठी म्हणून साईनाथ ला गणवेशातील तीन नक्षली दूर घेऊन गेले.बराच वेळ होऊनही तो परतलाच नाही.काही वेळाने एका शेतकऱ्याने मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती दिली,त्यानंतर साईनाथ नरोटीच्या कुटुंबाने तिकडे धाव घेतली.मुलाला रक्ताच्या थारोळ्यात पाहून नक्षल्यांनी गोळ्या झाडून संपविले असल्याचे उघडकीस आले.

साईनाथ चैतू नरोटी वय २६ वर्षे असे दुर्दैवी विद्यार्थ्याचे नाव आहे.साईनाथ पदवीच्या अंतिम वर्षात शिकत होता.चैतू नरोटी हे भामरागड तालुक्यातील मरदुर येथील रहिवासी असून गावातील सधन शेतकरी म्हणून त्यांचा समावेश आहे.त्यांचा मुलगा लहानपणापासूनच हुशार होता.त्याला आई- वडिलांनी जिद्दीने शिकवले.साईनाथ होळीला गावी आला होता. त्याला परत जायचे होते; पण आई-वडिलांसह शेतात गेला आणि नक्षल्यांचा शिकार झाला. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!