- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-डिजिटल युगात सायबर गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसून येत आहे.काही कालावधीपासून डिजिटल अरेस्टच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांपासून ते कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. अश्यातच आता ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीचा नवा फंडा आणला आहे.या नव्या फसवणुकीत तुम्ही जर कां हाताची दोन बोटे दाखवून सेल्फी काढत असाल तर लगेच सावधगिरी बाळगा. कारण,फिंगरप्रिंट चोरीची नवी ‘एआय'(AI) पद्धत तुमच्या बँकेतील संपूर्ण आयुष्याची जमा-पुंजी रिकामी करू शकते.विशेष म्हणजे,हल्ली स्मार्टफोनवर सेल्फी काढणे आणि ती सोशल मीडियावर पोस्ट करणे ही एक फॅशन झाली आहे.फोटो काढतांना अनेकदा नकळतपणे हाताची दोन बोटे दाखवून ‘व्हिक्टरी’ किंवा ‘व्ही’ साइन देण्याची सवय अनेक लोकांना असते.मात्र, तुमची हीच सवय तुम्हाला आर्थिक संकटात फसवू शकते.सायबर गुन्हेगारांनी आता लोकांचे बँक खाते रिकामे करण्यासाठी ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स'(AI)चा वापर करून फिंगरप्रिंट चोरी करण्याची नवीन पद्धत शोधली आहे.सायबर तज्ज्ञांच्या मते,जर तुम्ही मोबाईलच्या कॅमेऱ्यासमोर बोटे दाखवून फोटो काढत असाल आणि तो फोटो हाय-क्वालिटी असेल,तर तुमचे बायोमेट्रिक डिटेल्स धोक्यात येतात.जर फोटो सुमारे दीड मीटर अंतरावरून काढला असेल,तर चोरांना बोटांचे ठसे अगदी स्पष्टपणे मिळवता येतात.अगदी दीड ते तीन मीटर अंतरावरून काढलेल्या फोटोंमधूनही सायबर चोरटे सुमारे पन्नास टक्के फिंगरप्रिंट डेटा सहज गोळा करू शकतात आणि ‘एआय’ तंत्रज्ञानाच्या मदतीने या फिंगरप्रिंट्सची हुबेहूब नक्कल तयार केली जाते.आपण बँकेचा किंवा सोशल मीडियाचा पासवर्ड विसरलो तर तो रिसेट करता येतो.मात्र,आपले फिंगरप्रिंट्स बदलता येत नाहीत.हा बायोमेट्रिक डेटा एकदा चोरीला गेल्यास तुमची बँक खाती,डिजिटल पेमेंट सिस्टम(युपिआय) आणि वैयक्तिक ओळखीला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे,सोशल मीडियावर फोटो शेअर करतांना सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे; अन्यथा मोठ्या फसवणुकीला सामोरे जाण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
- Advertisement -

