उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार ४९० रुपये नोंदवला गेला आहे,तर १ किलो चांदीची किंमत १ लाख ९६ हजार ५७० रुपये,तर १० ग्रॅम चांदीचा दर १ हजार ९६६ रुपये नोंदवला गेला आहे.विशेष म्हणजे,उत्पादन शुल्क,स्थानिक राज्य कर आणि घडणावळ शुल्क(मेकिंग चार्जेस)यांमुळे प्रत्येक शहरात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये किरकोळ फरक दिसून येतो.अश्यातच २२ कॅरेट सोन्यासाठी १० ग्रॅमचा भाव १ लाख ३० हजार ६१६ रुपयांवर आला आहे.शुद्धतेच्या दृष्टीने २४ कॅरेट सोने हे ९९.९ टक्के शुद्ध मानले जाते,परंतु अतिशय मऊ असल्याने त्यापासून थेट टिकाऊ दागिने बनवणे शक्य नसते.म्हणूनच दागिने तयार करण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचा सर्वाधिक वापर केला जातो,ज्यामध्ये ९१ टक्के शुद्ध सोने आणि उर्वरित ९ टक्के तांबे,चांदी किंवा जस्त यांसारख्या इतर धातूंचे मिश्रण केले जाते.महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील आजचे दर-मुंबई, पुणे व नागपूर शहरात २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १ लाख ३० हजार ३७८ रुपये आणि २४ कॅरेट सोन्याचा दर १ लाख ४२ हजार २३० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.दसऱ्याच्या सणानंतर सोने-चांदीच्या दरांमध्ये सुरू झालेली घसरणीची मालिका दिवाळीच्या तोंडावरही कायम राहिल्याने सण-उत्सवाच्या काळात दागिने आणि सोने खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे.
सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

