Monday, August 10, 2026
Homeगडचिरोलीसिद्धी निधी लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण…

सिद्धी निधी लिमिटेड कंपनीच्या अध्यक्षांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना नोटबुकचे वितरण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोलीतालुक्याच्या जिल्हा परिषद शाळा मरेगाव येथील शालेय विद्यार्थ्यांना आरमोरी सिद्धी निधी लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ साखरे यांनी आपले समाजाशी आणि देशाचे उद्याचे भविष्य म्हटले जाणाऱ्या विद्यार्थ्यांशी काहीतरी देणे-घेणे असते; या सादिक भावनेतून एक सामाजिक बांधिलकी जोपासत शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी नोटबुकचे वितरण केले आहे.

सिद्धार्थ साखरे हे नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदवून घेत असतात.गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव त्यांनी कधीच केलेला नाही.गोर- गरिबांसाठी शैक्षणिक,आर्थिक व इतर मदत करणे हा त्यांचा मूळ स्वभाव आहे.यापूर्वीही त्यांनी अनेकदा अनेकांना मदत केली आहे.शालेय विद्यार्थ्यांसह एखाद्या शाळेला भेट वस्तू देणे,एखाद्याच्या मदतीला धाऊन जाणे,आर्थिक मदत करणे व इतर अशा अनेक मदतीचे हात त्यांनी पुढे केले आहे.मात्र,त्यांनी कधीही प्रकाश झोतात येण्याचा प्रयत्न केलेला नाही.अशाच प्रकारे सिद्धार्थ साखरे यांनी मरेगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे भेट देऊन संपूर्ण विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण करून “झाडे लावा झाडे जगवा” असा संदेश देत वृक्षांचे वाटप केले आहे.

प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक गुणवंत हेडाऊ,शिक्षक चरणदास मडावी,शिक्षिका टेकाम,शिक्षिका सुरकर,इमामुद्दिन तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

धावपट्टीवरून घसरला विमान; अजित पवारांच्या आठवणी ताज्या..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या बारामती एअरफिल्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान एक ट्रेनर विमान धावपट्टीवरून घसरल्याची घटना आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडल्याने एकच खळबळ उडाली...

पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यात पोलिसांना यश..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याच्या दाखल गुन्ह्यात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी व तिच्यासोबत असलेल्या संशयित आरोपीचा शोध घेण्यात अनैतिक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!