उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- सध्याच्या घडीला सगळीकडेच लगीनघाई सुरू झाली असल्याने यंदा बऱ्यापैकी जोडपी विवाहाच्या बंधनात अडकणार आहेत. विवाहाच्या बंधनात तर अडकणार; मात्र कायद्याचे पालनही करणे तितकेच महत्त्वाचे आहे.असाच एक कायदा २००६ मध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आला असून १० नोव्हेंबर २००७ मध्ये सर्वत्र लागू करण्यात आला आहे.
बालविवाह कायदा मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे.मुलीचे वय १८ पेक्षा कमी आणि मुलाचे २१ पेक्षा कमी असेल तर तो बालविवाह समजला जातो.यास बेकायदा समजला जातो.जास्त वयाच्या पुरुषाने जर १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीसोबत विवाह केला; तर त्याला दोन वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.त्यासोबत मुला-मुलीचे आई-वडील,नातेवाईक यांच्यावरही कारवाई होऊ शकते.
जिल्ह्यातील महिला व बालकल्याण विभागाची करडी नजर बालविवाहांवर ठेवली जात असल्याने बालविवाह करू नका; असे आवाहन करण्यात आले आहे.