Tuesday, September 29, 2026
Homeगडचिरोलीसावधान..! वनविभागातील नोकरीचे आमिष पडू शकते महागात.. - वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी...

सावधान..! वनविभागातील नोकरीचे आमिष पडू शकते महागात.. – वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांची भरती आणि नियुक्ती शासनाच्या विहित नियमांनुसारच..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्रातील विविध भागांत काही व्यक्ती वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांवर नियुक्ती करून देण्याचे खोटे आमिष दाखवून उमेदवारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे.उमेदवारांना बनावट नियुक्ती आदेश देऊन त्याबदल्यात पैशांची मागणी केली जात आहे.उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता अशा प्रकारांबाबत सावधगिरी बाळगावी,असे आवाहन गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी केले आहे.
उमेदवारांची दिशाभूल करण्यासाठी वनविभागाच्या कार्यालयाचे बनावट लेटरहेड वापरले जात असून महाराष्ट्र शासनाच्या लोगोचाही गैरवापर केला जात आहे.त्यामुळे शासकीय स्वरूपात दिसणारा नियुक्ती आदेश मिळाला तरी त्याची अधिकृत माध्यमांतून खातरजमा करावी.कोणत्याही व्यक्तीच्या आश्वासनावर विश्वास ठेवून पैसे देऊ नयेत.
वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांची भरती आणि नियुक्ती शासनाच्या विहित नियमांनुसार केली जाते.पैसे किंवा वैयक्तिक संपर्काच्या आधारे या पदांवर नियुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन देणाऱ्या व्यक्तींशी उमेदवारांनी आर्थिक व्यवहार करू नयेत,असे मुख्य वनसंरक्षक नरवणे यांनी स्पष्ट केले.
नियुक्तीच्या मोबदल्यात पैशांची मागणी झाल्यास, बनावट नियुक्ती आदेश मिळाल्यास किंवा वनविभागाच्या नावाने संशयास्पद कागदपत्रे सादर करण्यात आल्यास संबंधितांनी तात्काळ मुख्य वनसंरक्षक(प्रादेशिक), पोटेगाव रोड,गडचिरोली यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.भरतीसंदर्भातील माहिती शासन व वनविभागाच्या अधिकृत माध्यमांवरूनच तपासावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुष्ठांतेयांची तालुका स्तरावर ११ सदस्यीय कार्यकारिणी गठित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,भिसी येथे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या माध्यमातून २८ सप्टेंबर रोजी कुष्ठांतेयांची सभा आयोजित करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी...

कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये; पात्र मतदाराचे नाव यादीतून वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या- विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-“कोणताही पात्र नागरिक मतदानापासून वंचित राहू नये.विशेषतः रोजगारासाठी काही काळ गावाबाहेर गेलेल्या नागरिकाचे नाव केवळ त्याच्या तात्पुरत्या अनुपस्थितीमुळे मतदार यादीतून वगळले...

ऑनलाईन ‘यूपिआय’ पेमेंटच्या शुल्क आकारणीवर व्यापारी संघटनांचा आक्रमक पवित्रा.. – ‘या’ दिवशी स्वीकारणार नाहीत युपिआयद्वारे पेमेंट..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही वर्षांत सर्वत्र डिजिटल पेमेंट ही दैनंदिन सवय बनली आहे.दूध विक्रेत्यांपासून ते पेट्रोल पंप,भाजीवाले आणि मोठ्या शोरूमपर्यंत सर्वत्र युनिफाइड पेमेंट...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; मुलगी पाच महिन्यांची गर्भवती,तरुणाला अटक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आला.विशेष म्हणजे,मुलीची प्रकृती...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!