- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-रेल्वे प्रशासनाने पायाभूत सुविधा विकासकामांना गती देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या अनुषंगाने दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने नागपूर मंडळांतर्गत येणाऱ्या डोंगरगड येथे अप-अतिरिक्त लूप लाइन तयार करण्यासाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग व नॉन-इंटरलॉकिंग कामे केली जाणार आहेत.या कामामुळे परिचालन क्षमता वाढवण्यासोबतच सुरक्षेचे मानके अधिक मजबूत होणार आहे.या कामासाठी काही मेमू आणि पॅसेंजर गाड्या येत्या,२७ ते २९ डिसेंबरपर्यंत सलग तीन दिवस रद्द राहणार आहेत.
रद्द असलेल्या गाड्यांमध्ये गाडी क्र.६८७४१ दुर्ग-गोंदिया मेमू दुर्गहून २७ डिसेंबर रोजी रद्द,गाडी क्र. ६८७४३ गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू गोंदियाहून २७ डिसेंबर रोजी रद्द,गाडी क्र.६८७४४ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-गोंदिया मेमू इतवारीहून २७ रोजी रद्द,गाडी क्र.६८७४२ गोंदिया-दुर्ग मेमू गोंदियाहून २७रोजी रद्द,गाडी क्र.६८७०९ रायपूर डोंगरगड मेमू रायपूरहून रद्द,गाडी क्र.६८७११ मेमू डोंगरगड-रायपूर डोंगरगडहून २८ डिसेंबर रोजी रद्द, गाडी क्र.६८७१३ गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू गोंदियाहून २८ रोजी रद्द, गाडी क्र.६८७१४ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-बालाघाट मेमू इतवारीहून २८ रोजी रद्द,गाडी क्र.६८७१५ बालाघाट-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू बालाघाटहून २८ रोजी रद्द,गाडी क्र.६८७१६ नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-गोंदिया मेमू इतवारीहून २८ रोजी रद्द,गाडी क्र. ६८७१२ गोंदिया-डोंगरगड मेमू गोंदियाहून २८ रोजी रद्द,गाडी क्र.६८७२९ रायपूर-डोंगरगड मेमू रायपूरहून २७ डिसेंबर रोजी रद्द,गाडी क्र.६८७२४ गोंदिया-रायपूर मेमू गोंदियाहून २८ रोजी रद्द,गाडी क्र.६८७१० डोंगरगड-रायपूर मेमू डोंगरगडहून २९ डिसेंबर रोजी रद्द राहणार आहे.यामुळे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसणार आहे.
- Advertisement -

