Monday, July 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसर्प मित्रांसाठी आनंदाची बातमी.. आता सर्पमित्रांना 'फ्रंटलाइन वर्कर' दर्जासह मिळणार दहा लाखाचा...

सर्प मित्रांसाठी आनंदाची बातमी.. आता सर्पमित्रांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ दर्जासह मिळणार दहा लाखाचा अपघात विमा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-एखादा साप दिसून आला की,अंगावर शहारे येऊन अनेकांची घाबरगुंडी होत असते.साप विषारी की बिन विषारी,याकडे कुणीही बघत नसतो.काहीजण सापाला मारण्याचा प्रयत्न करतात,तर काहीजण मोबाईल काढून पटकन सर्प मित्रांना कळवतात.सर्प मित्र क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल होत नागरिकांच्या मदतीला धावत असतात.आपला जीव धोक्यात घालून नागरिकांच्या मदतीला धावणारे आणि वन्यजीव असलेल्या सापांचीही माणसांच्या तावडीतून सुटका करणारे सर्पमित्र आता ‘फ्रंटलाइन वर्कर’ होणार आहेत.शासनाकडून सर्पमित्रांना ‘फ्रंटलाइन वर्कर’ चा दर्जा देण्याची तयारी असून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे तशी शिफारस केली आहे.विशेष म्हणजे, शासनाच्यावतीने या सर्पमित्रांना अधिकृत ओळखपत्र ही दिले जाणार आहे.ग्रामीण भागात वन्यजीव आणि मानवी संघर्ष कमी करण्यासाठी,विशेषतः सापांपासून
होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी मोलाची कामगिरी बजावणाऱ्या सर्पमित्रांना आता लवकरच अधिकृत ओळखपत्र आणि १० लाख रुपयांचा अपघात विमा मिळणार आहे.त्यांना ‘अत्यावश्यक सेवा’ आणि ‘फ्रंटलाइन वर्कर’ म्हणून दर्जा देण्याबाबतही सकारात्मक विचार सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल,असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.त्यामुळे जीव धोक्यात घालून कार्य करणाऱ्या सर्प मित्रांसाठी सरकार सकारात्मक भूमिका बजावत असल्याचे दिसून येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!