Monday, March 17, 2025
Homeगडचिरोलीसण,उत्सवाच्या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्याची परवानगीचे आदेश निर्गमित..
spot_img

सण,उत्सवाच्या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्याची परवानगीचे आदेश निर्गमित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली : – शासननिर्णयाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियत २१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी, जिल्ह्याच्या निकडीनुसार वर्षामध्ये १५दिवस निश्चित करुन सकाळी ६ वाजल्यापासून रात्री १२ वाजेपर्यंत सुट जाहिर करण्याकरीता संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना राज्य शासनाद्वारे प्राधिकृत केलेले आहे.जिल्हाधिकारी यांनी संबंधित ध्वनी प्राधिकरण तथा जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याशी सल्लामसलत करुन १५ दिवस जाहिर करण्याचे निर्देश आहेत.

पोलीस अधिक्षक,गडचिरोली यांचे पत्रानुसार चालु वर्षात पुढीलप्रमाणे दिवस निश्चित करुन सण, उत्सवाच्या दिवशी ध्वनीक्षेपक व वाद्य वाजविण्याची परवानगी सकाळी ६ वाजेपासून ते रात्रो१२ वाजेपर्यंत पावेतो निर्धारीत करुन आदेश निर्गमित होणेस विनंती केलेली आहे.छत्रपती शिवाजी महाराज जयंती- १ दिवस १९ फेब्रुवारी २०२३, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती- १ दिवस १४ एप्रिल २०२३, १ मे महाराष्ट्र दिन– १दिवस, गणपती उत्सव– ३ दिवस दुसरा,सातवा व अनंत चतुर्थदशी), ईद ए मिलाद-१ दिवस २८ सप्टेंबर २०२३,नवरात्री उत्सव–२ दिवस अष्टमी, नवमी,विजयादशमी-१ दिवस २४ ऑक्टोंबर २०२३, दिवाळी- १ दिवस लक्ष्मीपूजन १२ नोव्हेंबर,ख्रिसमस – १दिवस २५ डिसेंबर २०२३,३१ डिसेंबर – १ दिवस.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गडचिरोली २०२३ या वर्षामध्ये वरीलप्रमाणे ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिप्पणीनुसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक इत्यादींच्या वापराबाबत श्रोतृगृहे, सभागृहे, सामुहिक सभागृहे आणि मेजवानी कक्ष यासारख्या बंद जागांखेरीज इतर ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यांचा वापर पुढील अटी व शर्तीच्या अधिन राहून आदेशाद्वारे घोषित करीत आहे.केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० व ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, २०१७ च्या नियम ५ उपनियम (३) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरण यांचे तंतोतंत पालन करावे.जनहित याचिका क्र.173/2010 मध्ये मा. उच्च न्यायालयाने दिनांक 16 ऑगस्ट 2016 रोजी दिलेल्या आदेशाचे अनुषंगाने ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापरण्यात यावे. उपरोक्त अधिसूचनेत घालून दिलेल्या ध्वनी मर्यादेचे व तरतूदींचे उल्लंघन होणार नाही यासाठी आवश्यक त्या उपाययोजना संबंधित विभागाने कराव्या. ही सुट राज्य शासनामार्फत घोषित शांतता क्षेत्रात लागू नाही. कोविड-19 चे अनुषंगाने शासनाने निर्गमित केलेल्या व वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या नियमावली अधीन अटी व शर्ती लागू राहतील असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -
spot_imgspot_img

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून अज्ञाताने ग्रामपंचायतीची कागदपत्रे जाळली..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव ग्रामपंचायत येथील सुट्टीच्या दिवसांची संधी साधून अज्ञाताने बंद ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून कार्यालयातील लोखंडी आलमारीतील महत्वाची कागदपत्रे पेट्रोल ओतून...

२२ वर्षीय तरुणीची राहत्या घरीच गळफास

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचोली येथे एका २२ वर्षीय तरुणीने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रविवार सकाळच्या सुमारास उघडकीस...

दुचाकी स्लीप होऊन बसचे चाक डोक्यावरून गेल्याने महिलेचा घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-पती-पत्नी आणि मुले घेऊन आपले स्वगावी दुचाकीने जात असतांना वाटेतच दुचाकी स्लीप होऊन समोरून येणाऱ्या बसचे चाक खाली कोसळलेल्या पत्नीच्या डोक्यावरून...

वाघाचे अवयव शिकार प्रकरणी धक्कादायक माहिती; सट्टापट्टीत आकडे सांगण्यासाठी वाघाच्या अवयवांचा वापर..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर प्रादेशिक वनविभागांतर्गत येणाऱ्या खापा वनपरिक्षेत्रात वाघाची शिकार झाल्याची घटना नुकतीच उघडकीस आली असून अज्ञात शिकाऱ्यांनी वाघाचे चारही पंजे,मिशा आणि दात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!