- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-कित्येकदा अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती ओढवून घेतली जाते.अश्यातच मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे व नदी पात्रातील वाढलेल्या पाण्यामुळे काही भागांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.सदर नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम तलाठी,ग्रामसेवक व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे सुरू असून नुकसानीच्या भरपाईसाठी शेतकऱ्यांची फार्मर आयडी(शेतकरी ओळखपत्र)असणे अत्यावश्यक आहे.राज्य शासन व केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने आपली फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे.पीकविमा,पीक कर्ज,पीक नुकसान भरपाई,विविध अनुदान योजना, पीकपद्धती सुधारणा यासाठी फार्मर आयडी अनिवार्य आहे.सातबाऱ्यावर नाव असलेल्या सर्व खातेदारांनी त्वरित ऑनलाइन ई-केवायसी करून आपली फार्मर आयडी बनवून घ्यावी.ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी नसेल,त्यांना शासनाच्या योजना व नुकसानभरपाईचा लाभ मिळणार नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
ही लागणार दस्ताऐवज👇
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
आधार कार्ड,मोबाईल क्रमांक बैंक खात्याशी लिंक असलेला,७/१२ उतारा,नमुना ८ अ, बैंक पासबुक किंवा खाते तपशील इत्यादी कागदपत्रे फार्मर आयडीसाठी लागणार असून नजीकच्या ऑनलाईन सेतू केंद्रातून फार्मर आयडी काढून घ्यावी.
- Advertisement -

