उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा,गुरनोली,चिखली विद्युत फिडर वरील येणाऱ्या गेवर्धा,गुरनोली,देवुळगाव,खेडेगाव,चिखली, आंधळी,वडेगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना आठ तासाचा विद्युत पूरवठा होत आहे.आठ तासाचा विद्युत पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांच्या शेतीच्या पिकाला पाहिजे त्या प्रमाणात पाणी मिळत नाही.शेतीच्या शेवटच्या बांध्या पर्यंत पाणी जात नाही.शेतकऱ्यांनी उन्हाळी फसल लावली असून पाहिजे त्या प्रमाणात पिकांना पाणी पुरवठा होत नसल्याने पीक वाळण्याच्या मार्गावर आहेत.कसे बसे शेतकऱ्यांनी कमी जास्त पाण्यानी रोवणी केली आहे.रोवणीच्या वेळेसही पाण्याअभावी अनेकांचे परे सुद्धा जागेवर वाळून गेले.हल्ली पिकाला पाण्याची फार आवश्यकता असल्याने शेतीच्या धान पिकाला पाणी मिळाले नाही तर उभे पीक वाळून भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही.यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या शेती पंपांना चोवीस तास नाही तर कमीत कमी सोळा तास विद्युत पुरवठा करावा; या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने येत्या सोमवार १३ मार्च ला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र सिंह चंदेल,डॉ.महेंद्र कुमार मोहाबंशी उपजिल्हा प्रमुख तालुका प्रमुख,नगरसेवक गटनेते आशिष काळे पुंडलिक देशमुख माजी नगर सेवक,उप तालुका प्रमुख यांच्या नेतृत्वात गुरनोली फाट्यावर भव्य चक्का जाम व जेल भरो आंदोलनचे आयोजन केले आहे.तरी सर्व अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांनी बहु संख्येने उपस्थित राहावे.असे आव्हान शिवसेना उपतालुका प्रमुख तथा शेतकरी नेते राकेश खूने,विभाग प्रमुख गुणवंत कवाडकर देऊळगाव,दशरत लाडे विभाग प्रमुख, सेवादास खुने आंधळी,पुरशोत्तम तिरगंम विभाग प्रमुख चिखली,धनिराम झोडे खेडेगाव,बोरकर वडेगव यांनी केले आहे.