- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित झालेल्या व ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकित असलेल्या व ३१ मार्च २०२६ पर्यंत परतफेड न झालेल्या पीक कर्ज व पुनर्गठित/फेरपुनर्गठित कर्जास रुपये दोन लाखापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येणार आहे.
या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येत असुन यासाठी शासनाने महाआयटी यांची नियुक्ती केली आहे.या योजनेसाठी महाआयटी यांनी तयार केलेल्या योजना पोर्टलवर जिल्ह्यातील बँकांनी एकुण १५ हजार १४९ थकीत कर्ज खात्यांची माहिती अपलोड केली आहे.
महाआयटी यांनी संगणकीय संस्करण केलेल्या माहितीनुसार आतापर्यंत पहिल्या यादीमध्ये पहिली यादी ४ हजार ३७१,दुसरी यादी ३ हजार ६१०,तिसरी यादी २ हजार ६७९ व चौथी यादी २२५ असे एकुण १० हजार ८८५ इतक्या पात्र लाभार्थी शेतकऱ्यांची यादी शासनाकडून प्रसिध्द करण्यात आली आहे.महाआयटी यांनी संगणकीय संस्करण करुन आधार प्रमाणिकरण झालेल्या शेतकऱ्यांपैकी ६ हजार ५१३ पात्र लाभार्थ्यांना कर्जमुक्तीची रक्कम ३८ कोटी २४ लाख रुपये शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आली आहे.
२२ ऑक्टोंबर २०२६ रोजी एकापेक्षा जास्त बँकांमध्ये कर्ज खाती असलेल्या आणि दोन लाखापेक्षा कमी थकबाकी असलेल्या एकुण २१६ पात्र शेतकऱ्यांची
यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिध्द करण्यात येत आहे.जिल्हानिहाय यादी परिशिष्ट अ व बँकनिहाय यादी परिशिष्ट व मध्ये सोबत जोडले आहे.सदर लाभार्थ्यांची यादी बँक शाखा,विकास संस्था व ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
याबाबत पुढील प्रमाणे सुचना देण्यात येत आहेत.ही यादी कर्जमुक्तीची आहे.या यादीतील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्तीचा लाभ देण्यात येत आहे.या यादीमध्ये एकापेक्षा जास्त बँकेकडून पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.या यादीतील शेतकऱ्यांच्या कर्जबाकीची रक्कम ३१ मार्च २०२६ रोजीची आहे.०१ एप्रिल २०२६ रोजी नंतरचे व्याज व इतर खर्च माफ करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी ३१ मार्च २०२६ रोजीच्या कर्ज थकबाकीची खातरजमा करुन घ्यावी.या यादीत नाव असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी आपले सरकार सेवा केद्रांत जाऊन इ-केवायसी करुन घ्यावी.जेणेकरुन आपण सदर योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठराल. गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना लाभ तातडीने मिळण्याकरीता नजिकच्या आपले सरकार केंद्रावर सर्व शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी,गडचिरोली व जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था गडचिरोली यांनी केले आहे.
- Advertisement -

