Thursday, September 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तशेतकरी कर्जमाफीचे काम युद्ध पातळीवर सुरू..

शेतकरी कर्जमाफीचे काम युद्ध पातळीवर सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना कर्जमाफीचा लाभ मिळणार असून विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थामार्फत थकीत कर्जदार शेतकरी सभासदांची माहिती संकलित करून विहित नमुना प्रपत्र अ व बंद तयार करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू झाले आहे.त्यामुळे शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला वेग आला आल्याचे चित्र आहे.आवश्यक माहिती पुरविण्यासाठी शेतकऱ्यांना सहकार्य करण्याचे अपील केले जात आहे.
शासनाने राज्यातील शेती क्षेत्रात व शेतकऱ्यांच्या जीवनात अमूलाग्र बदल घडवून आपातकालीन, दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने कर्ज निवारण योजने संदर्भात माहिती मागितली आहे.या अनुषंगाने थकीत कर्जदार सभासदांची माहिती संकलित करून विहित नमुना प्रपत्र अ व बंद तयार करण्याचे काम संबंधित प्राथमिक कृषी पतपुरवठा सेवा सहकारी संस्था व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक शाखा स्तरावर सुरू आहे.या अनुषंगाने सेवा सहकारी संस्थांचे थकीत सभासदांच्या कर्ज खात्याविषयी व इतर माहिती संकलित करण्याचे काम संस्था पातळीवर सुरू आहे. तथापि,सेवा सहकारी संस्थांचे थकीत कर्ज असलेल्या बहुतांश सभासदांनी संबंधित सहकारी संस्थेच्या सचिवाची संपर्क करून त्यांचे आधार कार्ड फार्मर आयडी बँकेचे खाते क्रमांक व इतर आवश्यक माहिती अजूनही उपलब्ध करून दिलेली नाही.त्यामुळे सदर माहितीचे संकलन संस्था पातळीवर करता आलेले नाही.
कर्जदार शेतकरी सभासदांची माहिती प्रपत्र अ व ब मध्ये सादर करण्यात येणार असून अ नमुन्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची निश्चित केलेल्या तारखेची यादी व प्रपत्र ब मध्ये नियमित कर्ज परतफेड करणारे शेतकरी अशी वर्गवारी आहे.सन २०२१ ते २०२५-२६ अशी पाच वर्षाची माहिती यात भरली जाणार आहे.
आधार कार्ड,फार्मर आयडी,बँक खाते क्रमांक व इतर अनुषंगिक माहिती अद्यापही सेवा सहकारी संस्थांना सादर केलेली नाही अशा सर्व शेतकरी सभासदांनी संबंधित शाखेचे सचिव किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखेचे वसुली अधिकारी यांच्याशी त्वरित संपर्क करून त्यांचे आधार कार्ड व इतर माहिती उपलब्ध करून द्यावी, असे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था गोंदिया व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी म्हटले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप..!

उद्रेक न्युज वृत्त :-युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने उद्या,शुक्रवार ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली...

राज्यस्तरीय ज्युनियर ‘कुंग फू’ स्पर्धेत वांगेपल्ली शाळेच्या मोहनला कांस्यपदक..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पुणे येथे पार पडलेल्या २४ व्या राज्यस्तरीय 'ज्युनियर वुशू स्पर्धा-२०२६' मध्ये अहेरी तालुक्यातील वांगेपल्ली येथील शासकीय निवासी शाळेचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी...

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!