Sunday, September 27, 2026
Homeगडचिरोलीशिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त...

शिक्षण सेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेस सुरुवात; राज्यात ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
​गडचिरोली :-महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये ‘पवित्र पोर्टल’द्वारे शिक्षण सेवक आणि शिक्षक पदभरतीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
या प्रक्रियेअंतर्गत राज्यात एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती करण्यात येणार असून,यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील एकूण ८२८ पदे भरली जाणार आहेत.पात्र उमेदवारांनी आपले पसंतीक्रम येत्या,मंगळवार ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पोर्टलवर लॉक करावेत,असे आवाहन गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
​शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT-२०२५)दिनांक-२७ मे २०२५ ते ०५ जून २०२५ या कालावधीत घेण्यात आली होती.या चाचणीतील प्राप्त गुणांच्या आधारे इयत्ता १ ली ते १२ वी करिता रिक्त पदांची भरती करण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार संबंधित व्यवस्थापनातील रिक्त पदे आणि आरक्षणाचा विचार करून ८० टक्के पदांसाठी ही भरती प्रक्रिया नियोजित आहे.
  • गडचिरोली जिल्हा परिषद पदभरती(एकूण पदे: ८२८)👇
​गडचिरोली जिल्ह्यासाठी एकूण ८२८ पदे भरली जाणार असून त्याचा पदनिहाय तपशील खालीलप्रमाणे आहे:
​इयत्ता १ ली ते ५ वी: ८१५ पदे
​इयत्ता ६ वी ते ८ वी: ९ पदे
​इयत्ता ९ वी ते १० वी: ४ पदे (मराठी माध्यम- २, हिंदी माध्यम – २)
उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना व कार्यवाही:
​ संकेतस्थळ: उमेदवारांनी लॉगिन करून प्राधान्यक्रम जनरेट करण्यासाठी tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
​पसंतीक्रम नोंदविण्याची मुदत: पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची सुविधा दिनांक ०६/०८/२०२६ रोजी उपलब्ध करून देण्यात आली असून,उमेदवारांनी आपले पसंतीक्रम ११/०८/२०२६ पर्यंत दिलेल्या मुदतीत लॉक करणे अनिवार्य आहे.
​ पुढील प्रक्रिया: उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर,मुलाखतीशिवाय या प्रकारातील गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
​संपर्क/तक्रार निवारण: पदभरतीशी संबंधित उमेदवारांचे कोणतेही म्हणणे किंवा मागणी असल्यास त्यांनी edupavitra25@gmail.com या ई-मेलवर पाठवावे,जेणेकरून प्रशासनाकडून त्याची योग्य ती दखल घेतली जाईल.
​जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी विहित वेळेत पोर्टलवरील कार्यवाही पूर्ण करून या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पूरग्रस्त भागातील तीन गंभीर रुग्णांना तातडीने पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील तीन रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारांसाठी हेलिकॉप्टरने हेडरी येथे हलविण्यात आले. जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्या...

आज सर्व बँकांची दारे राहणार खुली..!

उद्रेक न्युज वृत्त :-विविध बँकांचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संपापूर्वी ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आज,रविवार २७ सप्टेंबरला देशभरातील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या शाखा खुल्या राहणार आहेत.या...

मलेरिया नियंत्रणासाठी व्यापक मोहीम; रुग्णसंख्येत मागील वर्षाच्या तुलनेत ४१.६ टक्के घट.. -५६६ रुग्णांच्या बँक खात्यात २ लाख ८३ हजार रुपयांची बुडित मजुरी जमा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात हिवताप(मलेरिया)नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत प्रतिबंधात्मक,निदानात्मक व उपचारात्मक उपाययोजनांची व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.दुर्गम व डोंगराळ भागातील...

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!