Wednesday, May 13, 2026
Homeगडचिरोलीशालार्थ आयडी घोटाळा म्हणजे नेमका काय? कसे अडकले मोठे मासे; वाचा संपूर्ण...

शालार्थ आयडी घोटाळा म्हणजे नेमका काय? कसे अडकले मोठे मासे; वाचा संपूर्ण माहिती.. – कोणीही एक मुख्य आरोपी नसून अधिकारी, लिपिकांसह शाळेचे संस्थाचालक एका रांगेत उभे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-शालार्थ आयडी घोटाळा केवळ नागपूर जिल्ह्यापुरताच सीमित राहिलेला नसून आता सर्वत्र राज्यभर जगजाहीर झालेला आहे.त्यामुळे अधिकारी, कर्मचारी व संस्था चालकांसह सर्वांचे धाबे दणाणले आहेत.यात केवळ नागपूर जिल्ह्यातीलच शिक्षकांची बोगस शालार्थ आयडी तयार करण्यात आली नाही तर गोंदिया,भंडारा,गडचिरोली व इतर जिल्ह्यांचाही समावेश असल्याचे हळूहळू उघड होऊ लागले आहे.त्यानुसार आता पुढील नंबर तुमचाही असे म्हणण्याची वेळ आली आहे.शालार्थ आयडी घोटाळ्यात शिक्षण विभागातील चार बड्या अधिकाऱ्यांना अटक झालेली आहे.तसेच नागपूर सायबर पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथकाची (SIT) स्थापनाही केली आहे.या एसआयटीच्या तपासात आतापर्यंत काय काय समोर आले? किती शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी बनवण्यात आले? यात कोणाकोणाला अटक करण्यात आली? याबाबत माहिती उघड झाली आहे.त्यानुसार सर्वात आधी चर्चा होत असलेले हे बोगस शालार्थ आयडी प्रकरण नेमके काय आहे? एखादा शिक्षक शाळेत शिक्षण सेवक म्हणून काम करत असेल तर त्याला सुरुवातीला काही वर्ष मानधन दिले जाते.त्यानंतर त्या शिक्षकाला नियमित केले जाते.नियमित झाल्यानंतर त्या शिक्षकाचा शालार्थ आयडी काढला जातो,त्याद्वारे शासनाकडून त्याला पगार सुरू होतो.हे आयडी तयार करण्याचे अधिकार शिक्षण उपसंचालकांना असतात.पण,हेच शालार्थ आयडी तयार करतांना काही बनावट कागदपत्रे जोडण्यात आल्याचे समोर आले आहे.तसेच काही अस्तित्वात नसलेल्या शिक्षकांचेही शालार्थ आयडी तयार करून शासनाच्या तिजोरीतून पगार(वेतन) काढण्यात आले.उदाहरण द्यायचे झाल्यास,एखादा शिक्षक २०१३ मध्ये शिक्षण सेवक म्हणून नियुक्त झाला असेल आणि २०२० मध्ये तो नियमित झाला असेल तर त्याची शालार्थ आयडी तयार करून त्याला २०२० पासूनचा पगार मिळायला पाहिजे. पण,गैरव्यवहार करत अधिकचे पैसे मिळवण्यासाठी या शिक्षकांची नियुक्ती मागील तारखेत दाखवून अनेक वर्षांचे थकीत वेतन उचलण्यात आले आहे.हा सगळा घोटाळा संस्थाचालक आणि शिक्षण विभागातल्या बड्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने चालत होता,अशी माहिती एसआयटीच्या प्रमुख आणि सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिता मेश्राम यांनी दिली आहे. शिक्षण विभागाला याबाबत संशय आल्यानंतर पुण्यातील प्राथमिक शिक्षण संचालकांनी नागपूर विभागीय अध्यक्ष चिंतामण वंजारी यांच्या नेतृत्वाखाली एक चौकशी समिती नेमली.त्यांना नागपूर जिल्ह्यातील ५८० शिक्षकांचे बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचे आढळले.ती यादी शिक्षण विभागाकडे पाठवण्यात आली.यादीची प्राथमिक तपासणी केली असता शालार्थ आयडी प्रणालीचा पासवर्ड हॅक करून किंवा त्याचा गैरवापर करून ड्राफ्ट जनरेट केल्याचे सुरुवातीला समोर आले होते.तसेच जिल्हा परिषद नागपूरमधील प्राथमिकचे वेतन व भविष्य निर्वाहचे अधीक्षक नीलेश वाघमारे यांनी वेतन देयक आणि थकीत देयक काढण्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले होते.या प्रकरणात शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी नीलेश वाघमारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.त्यांच्या निलंबनाच्या आदेशातच बोगस शालार्थ आयडी तयार केल्याचा उल्लेख होता. प्राथमिक चौकशीनंतर नागपूरच्या सायबर पोलीस ठाण्यात,आयडी-पासवर्ड हॅक करून बनावट शालार्थ आयडी तयार केल्याची तक्रार शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कर्मचारी रवींद्र पाटील यांनी दिली होती.त्यानुसार सायबर पोलिसांनी तपास सुरू केला.सायबर पोलिसांनी सुरुवातीला शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह त्यांच्या कार्यालयातील लिपिक सुरज नाईकला अटक केली.या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात येताच या प्रकरणात नागपूर सायबर पोलिसांनी एसआयटीची स्थापना केली. सध्या एसआयटीद्वारे या प्रकरणाचा तपास सुरू आहे.पोलिसांनी उल्हास नरड यांना अटक केल्यानंतर एकामागून एक लिंक समोर येत गेल्या. त्यानंतर शिक्षण उपसंचालक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक लक्ष्मण मंघाम यांना अटक करण्यात आली होती.त्यांच्या चौकशीतून नागपूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांना अटक करण्यात आली.विशेष म्हणजे,चिंतामण वंजारी यांच्या अध्यक्षतेखालीच सुरुवातीला शिक्षण विभागाने चौकशी समिती स्थापन केली होती. त्यानंतर निवृत्त शिक्षण उपसंचालक अनिल पारधी, माजी विभागीय उपसंचालक वैशाली जामदार या बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.तसेच शिक्षण विभागातील काही लिपिकांनाही अटक करण्यात आली आहे.एसआयटीने तपास हाती घेतल्यानंतर ९ आरोपींना अटक करण्यात आली होती.त्यापैकी उल्हास नरड,अनिल पारधी या बड्या अधिकाऱ्यांसह सुरज नाईक,सागर भगोले,भारत ढवळे या लिपिकांना जामीन मंजूर झाला आहे. वैशाली जामदार यांच्यासह चिंतामण वंजारी आणि मंघाम यांचा जामीन कोर्टाने फेटाळून लावला आहे. सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.जशा लिंक समोर येत आहेत त्यानुसार काही संस्थाचालकही रडारवर आहेत.धापेवाडा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी बहुद्देशीय शिक्षण संस्थेचे सचिव दिलीप धोटे यांना अटक करण्यात आली आहे.त्यांच्या संस्थेच्या दोन शाळा असून त्यांनी शिक्षकांची बोगस नियुक्ती केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.सध्या ते पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरू आहे.शासनाने सुरुवातीलाच निलंबनाची कारवाई केलेले वेतन अधीक्षक नीलेश वाघमारे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.एसआयटीच्या प्रमुख सुनिता मेश्राम यांनी दिलेल्या माहितीनुसार,सायबर पोलीस ठाण्यात सुरुवातीला शालार्थ आयडी हॅक किंवा त्याचा गैरवापर झाल्याची तक्रार आली होती.पण, एसआयटीने तपास केला असता शालार्थ आयडी हॅक झाला नसल्याने समोर आले आहे.कारण, बनावट आयडी तयार करण्याच्या प्रस्तावावर या बड्या अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत.विभागीय मंडळाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी यांनीच अप्रूव्हल दिले आहे.कागदपत्रांवर त्यांच्या सह्या असल्याचेही समोर आले आहे.तसेच सगळ्यात जास्त बनावट शालार्थ आयडी निलंबित शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्या कार्याकाळात तयार झाले आहेत.शिक्षण उपसंचालकांच्या आदेशावरूनच लिपिक शालार्थ आयडी तयार करतात.हे आयडी फक्त कार्यालयातून नाही,तर घरातूनही सुद्धा तयार करण्यात आले आहेत.यामध्ये कोणीही एक मुख्य आरोपी नसून अधिकारी,लिपिकांसह शाळेचे संस्थाचालक अशा सगळ्यांनी संगनमताने केलेला हा घोटाळा आहे.यामध्ये ६०० च्या वर शिक्षक,५० ते ६० संस्थाचालकांचा समावेश असून सध्या ४० शाळांची तपासणी सुरू आहे.यादीमध्ये नाव असलेल्या शिक्षकांनाही देखील चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.पण,भीतीपोटी शिक्षक चौकशीला सहकार्य करत नाहीत.सध्यातरी हा घोटाळा जवळपास २०० कोटी रुपयांचा असल्याचा अंदाज आहे.मात्र,त्याचा नेमका आकडा हा एसआयटीची चौकशी पूर्ण झाल्यावरच समोर येईल.कारण,अजून अनेक शाळांचा चौकशी सुरू आहे.बनावट शालार्थ आयडी तयार केलेल्या शिक्षकांचे पगार सध्या शासनाने थांबवले आहेत. तसेच ज्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे,त्यांनी या घोटाळ्यात किती पैसा लाटला त्यासाठी बँकेला पत्र पाठवण्यात आले आहे.या अधिकाऱ्यांची बँक खाती गोठवण्याचेही काम सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहशतवादविरोधी पथकाचे नागपूर,भंडारा,चंद्रपूरसह रज्याभरात छापे..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दहशतवादविरोधी पथकाने आज,बुधवार १३ मे रोजी सकाळपासूनच राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा चालवला.पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मुंबईसह...

गडचिरोली जिल्ह्यातील सात तालुक्यात होणार ४८ हजार लिटर केरोसीनचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य युद्धजन्य परिस्थितीचा विचार करून उद्भवणाऱ्या संभाव्य जोखमीचे निराकरण करण्यासाठी स्वयंप्रकाशासाठी व दिवाबत्तीसाठी सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत केरोसीनचे तालुकानिहाय वाटप करण्याचा निर्णय...

नऊ आरोग्य कर्मचाऱ्यांना ‘फ्लोरेंस नाईटिंगेल’ पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहात  'फ्लोरेंस नाईटिंगेल जिल्हास्तरीय पुरस्कार' वितरण सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.या सोहळ्यात...

चक्क वाळू डेपोच्या सावंगी रेतीघाटात अवैध वाळू उपश्याचा खेळ..! – देसाईगंज महसूल अन् पोलीस विभाग निद्रावस्थेत; आम्ही सांगणार तेव्हाच डोळे उघडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात हल्ली रेती उपशाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.पुढील महिन्यापासून लिलाव झालेल्या सर्व रेती घाटांचा ताबा तहसील कार्यालयाकडे सोपविण्यात येणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!