Wednesday, July 8, 2026
Homeगडचिरोलीविषप्राशन प्रकरणात उपचार सुरू असतांनाच महिलेचा मृत्यू; आरोग्य विभागाचा खुलासा..

विषप्राशन प्रकरणात उपचार सुरू असतांनाच महिलेचा मृत्यू; आरोग्य विभागाचा खुलासा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील
कांदोळी येथील मिरा गणेश लेखामी वय २३ वर्षे या महिलेच्या विषप्राशनामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत जिल्हा आरोग्य विभागाने वस्तुस्थितीदर्शक प्राथमिक खुलासा केला असून,उपलब्ध यंत्रणेद्वारे तात्काळ उपचार व संदर्भ प्रक्रिया करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.
काल,सोमवार ४ मे २०२६ रोजी कांदोळी येथील मिरा  लेखामी या महिलेने कौटुंबिक कारणाने ऑर्गॅनोफॉस्फरस (OP)विषप्राशन केल्याची घटना सकाळच्या सुमारास घडली.घटनेनंतर रुग्णाच्या नातेवाईकांनी कांदोळी उपकेंद्र किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र(PHC)बुर्गी यांना कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती किंवा संपर्क साधलेला नव्हता.त्यांनी परस्पर दुचाकीवरून रुग्णास बुर्गी येथे नेण्याचा निर्णय घेतला.सदर रुग्ण सकाळी १०.५० वाजता प्राथमिक आरोग्य केंद्र,बुर्गी येथे दाखल झाला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ तपासणी करून प्राथमिक उपचार सुरू केले.मात्र,रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
प्राथमिक उपचारानंतर रुग्णाला प्राथमिक आरोग्य केंद्र बुर्गी येथील रुग्णवाहिकेद्वारे ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे पाठविण्यात आले.त्या वेळी रुग्णवाहिका चालक रजेवर असल्याने पर्यायी व्यवस्था करून रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली होती.ग्रामीण रुग्णालय, एटापल्ली येथे उपचार सुरू असतांना विषबाधेची तीव्रता अधिक असल्यामुळे काही वेळातच संबंधित महिलेचा मृत्यू झाला.
सदर प्रकरणात आरोग्य विभागाने उपलब्ध संसाधनांच्या आधारे तत्काळ प्रतिसाद देत रुग्णाला योग्य वेळी संदर्भित केले होते.नातेवाईकांनी सुरुवातीस आरोग्य केंद्राशी संपर्क न साधता दुचाकीचा वापर करून रुग्ण नेल्यामुळे प्रारंभी विलंब झाला असला,तरी आरोग्य केंद्रात पोहोचल्यानंतर पुढील संपूर्ण प्रवास शासकीय रुग्णवाहिकेद्वारेच करण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे, जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला शिक्षकांचे शाळा बंद आंदोलन; शिक्षकांच्या प्रश्नांकडे वेधणार लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त :-शिक्षकांचे राज्य स्तरावर प्रलंबीत प्रश्न निकाली काढण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटना,शिक्षक संघटना समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती,...

‘पावसाळा आला आरोग्य सांभाळा..!’ ग्रामपंचायतींना पाणी शुद्धीकरणाचे कडक निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या आगमनासोबतच ताप, सर्दी-खोकला,डेंग्यू,मलेरिया,टायफॉइड आणि कॉलरा यांसारख्या जलजन्य व कीटकजन्य आजारांचा धोका वाढतो.नागरिकांनी आरोग्यविषयक योग्य खबरदारी घ्यावी आणि सुरक्षित राहावे,यासाठी सार्वजनिक...

उद्यापासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर होणार कमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-जुलैच्या सुरुवातीला मुंबईसह पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली असली तरी राज्यातील विविध भागांमध्ये अद्याप सरासरी पेक्षा कमी पाऊस पडला आहे; विशेषतः खानदेश(धुळे...

येत्या शुक्रवारी आरमोरीत रोजगार मेळाव्याचे आयोजन; ५६० रिक्त पदांसाठी राबविण्यात येणार भरती प्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र(मॉडेल करिअर सेंटर), गडचिरोली आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,आरमोरी यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,शुक्रवार १० जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!