Wednesday, October 28, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविवाह नोंदणीच्या तारखेतील घोळाने दाम्पत्याला चढावी लागली हायकोर्टाची पायरी...

विवाह नोंदणीच्या तारखेतील घोळाने दाम्पत्याला चढावी लागली हायकोर्टाची पायरी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-लग्नाची तारीख हुकली आणि सहा महिन्याने विवाह झाला.विवाह नोंदणीमध्ये लग्नपत्रिकेवरील तारीख नोंद झाली.या तारखेच्या घोळाने दाम्पत्याला मात्र हायकोर्टाची पायरी चढावी लागली.हायकोर्टाने दाम्पत्याला मोठा दिलासा देत मॅरेज सर्टिफिकेटवर नव्याने तारीख नमूद करण्याची मुभा दिली.महापालिकेला तशी दुरुस्ती करून नव्याने मॅरेज सर्टिफिकेट देण्याचे आदेश दिले.
पुण्याचे रहिवाशी असलेल्या मात्र नोकरीनिमित्त परदेशी असलेल्या वधूने पुण्याच्या मुलाशी २३ मे २०२३ रोजी २ पुणे येथे विवाह निश्चित केला.लग्न पत्रिकाही छापल्या.मात्र,त्या दिवशी वधू पुण्याला पोहचली नाही.त्यामुळे विवाह पुढे ढकलण्यात आला. ५ नोव्हेंबर २०२३ रोजी वधू भारतात आली आणि ६ नोव्हेंबरला बोहल्यावर चढली.रीती रिवाजाप्रमाणे विवाह झाला.त्यानंतर वधू तातडीने परदेशात गेली. मॅरेज सर्टिफिकेटसाठी रीतसर पालिकेकडे अर्ज केला.
पालिकेकडून त्यांना मॅरेज सर्टिफिकेट मिळाले. परदेशी शिक्षण घेण्यासाठी वराने व्हिसासाठी अर्ज केला. मात्र,मॅरेज सर्टिफिकेटमध्ये चुकीची तारीख असल्याने व्हिसा मिळण्यास अडचणी येऊ लागली.याबाबत पालिकेशी संपर्क साधला.मात्र पालिकेने तारीख बदलून देण्यास नकार दिला.अखेर दाम्पत्याने उच्च न्यायालयात धाव घेऊन याचिका दखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती बी.पी.कुलाबावाला व न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.यावेळी महापालिकेला दुरुस्ती करून नव्याने मॅरेज सर्टिफिकेट देण्याचे आदेश देत याचिका निकाली काढली.
मॅरेज सर्टिफिकेटवर चुकीची तारीख नमूद झाली यात पुणे महापालिकेचा दोष नाही.लग्नपत्रिकेवरील तारखेनुसार प्रशासनाने मॅरेज सर्टिफिकेट जारी केल्याचे मान्य करून याचिकाकर्त्याने आपली चूक कबूल केली.खंडपीठाने याची दखल घेत याचिकाकार्त्याला चूक सुधारण्यासाठी संधी दिली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा फेब्रुवारीत..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत चौथी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणारी प्राथमिक व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा ही येत्या,२१ फेब्रुवारी २०२७ रोजी...

शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे वाटपासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकरी व पशुपालकांना शंभर टक्के अनुदानावर चारा बियाणे उपलब्ध करून...

गडचिरोली जिल्ह्यात ५४ धान खरेदी केंद्रांना मंजुरी; आधारभूत धान खरेदीसाठी २० केंद्रांवर शेतकरी नोंदणी सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२६-२७ साठी महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत ५४ धान खरेदी केंद्रांना...

चित्तथरारक घटना..! दोन वाघांची दुचाकीवर झडप; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यातून एक चित्तथरारक घटना समोर आली आहे.रात्रीच्या अंधारात जंगलमार्गे दुचाकीने गावाकडे परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीवर दोन वाघांनी झडप घालून तरुणाला ठार केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!