Saturday, May 30, 2026
Homeगडचिरोलीविमुक्त जाती,भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आमंत्रित

विमुक्त जाती,भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज आमंत्रित

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- विमुक्त् जाती भटक्या जमाती प्रवर्गातील धनगर समाजाच्या ज्या विद्यार्थ्यांना शासकिय वसतीगृहात अर्ज करुनदेखील शासकिय वसतीगृहात प्रवेश मिळालेला नाही अशा विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या धनगर समाजातील विद्यार्थ्यांना “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना” अंतर्गत शिक्षण घेता यावे अशा विद्यार्थ्यांना भोजन,निवास, व इतर शैक्षणिक सुविधा स्वत: उपलब्ध करून घेणेसाठी  आवश्यक ती  रक्क्म विद्यार्थ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करणेकरिता शासनाने दि.६ सप्टेंबर २०१९ च्या सुधारित शासन निर्णयान्वये “पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम योजना” सुरु करण्यात आलेली आहे.या योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वी नंतरच्या नंतरचे उच्च शिक्षण  मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभुत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा.विद्यार्थि हा अभ्यासक्रमांमध्ये प्रॉपर जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या  विविध स्तरातील महाविद्यालयात/शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतलेला असावा.या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वीच्या  परिक्षेमध्ये ६०% गुण असणे अनिवार्य आहे.

या योजनेमध्ये दिव्यांग(विजाभज प्रवर्गातील धनगर समाज)प्रथम आरक्षण असेल.या योजनेचा लाभ घेणेसाठी विद्यार्थ्याने विजाभज,इमाव,विमाप्र,कल्याण विभागच्या महाडिबीटी पोर्टलवरील अर्ज मंजुर झालेला असावा.सदर योजनेचा लाभ घेणेकरिता विद्यार्थ्याचे वय २८ वर्षापेक्षा अधिक नसावे.सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्राकरिता विद्यार्थ्यांनी १६ फेब्रुवारी २०२३ पर्यंत सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण, गडचिरोली यांचेकडे अर्ज सादर करण्यात यावे.सदर योजनेचा लाभ घेणेसाठी विहीत अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण ,गडचिरोली या कार्यालयात उपलब्ध आहे.असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण गडचिरोली  यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

‘जागतिक तंबाखू विरोधी दिन’ व ‘उच्चरक्तदाब दिना’ निमित्त पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' आणि 'जागतिक उच्चरक्तदाब दिना'चे औचित्य साधून गडचिरोली येथे एक विशेष आरोग्य जनजागृती आणि तपासणी शिबिर उत्साहात पार...

कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा; स्वतःचीच दोन मुले विकली दोन लाखात.. – अल्पवयीन मुलीसोबत भयंकर कृत्य..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-काही कालावधीपासून चंद्रपूर जिल्ह्यात खतरनाक कारनामे उघडकीस येऊ लागलेत.विविध कारनामे उघड होत असतांनाच नुकताच एका कसाई मातेचा माणुसकीला काळिमा फासणारा कारनामा...

आदिवासी महामंडळाच्या नियोजनशून्यतेमुळे शेतकरी संकटात; रब्बीची धान खरेदी केंद्रे अद्याप बंदच.. – गोदामे जुन्याच धानाने गच्च भरलेली..

उद्रेक न्युज वृत्त  गौरव नागपूरकर/देसाईगंज :-रब्बी हंगामातील धान खरेदीसाठी आदिवासी विकास महामंडळाची खरेदी केंद्रे अद्याप सुरू न झाल्याने देसाईगंज(वडसा)परिसरासह गडचिरोली जिल्ह्यातील हजारो शेतकरी तीव्र चिंतेत सापडले...

रखरखत्या उन्हात शेतातच टाकली खाट अन् उपोषणास केली सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे हत्यार उपसून आज,शनिवार ३० मे पासून सकाळी दहा वाजे जालना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!