- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक उद्या,शुक्रवार २३ ऑक्टोंबर रोजी होणार असून येत्या २७ ऑक्टोंबर रोजी मतमोजणी होणार आहे.त्यानुसार,मतदारांची नावे ऑनलाईन उपलब्ध असून ती पाहण्याचे आवाहन निवडणूक विभागाकडून करण्यात आले आहे.
- घरबसल्या मोबाईलवर मतदार यादीत नाव आणि मतदान केंद्र कसे तपासावे?
पदवीधर मतदारांना आपले नाव मतदार यादीत आहे की नाही आणि आपले मतदान केंद्र कोणते आहे,हे शोधण्यासाठी मोबाईलवर खालील स्टेप नुसार माहिती तपासावी:
स्टेप १: सर्वात आधी आपल्या मोबाईलमधील Google ब्राउझर उघडा आणि maha voter search असे सर्च करा.
स्टेप २: सर्च केल्यानंतर मिळालेल्या पहिल्या अधिकृत लिंकवर म्हणजेच
https://mahaelection.gov.in/Citizen/Search या वेबसाईटवर क्लिक करा.
स्टेप ३: वेबसाईट उघडल्यावर Constituency (मतदारसंघ) या पर्यायामध्ये Graduates’ (पदवीधर) हा पर्याय निवडा.
स्टेप ४: त्यानंतर Search By या पर्यायामध्ये District + Taluka + Name हा पर्याय निवडा.
स्टेप ५: आता District (जिल्हा) या कॉलममध्ये आपला जिल्हा निवडा.
स्टेप ६: Taluka (तालुका) हा पर्याय वैकल्पिक आहे. तालुका माहीत असल्यास निवडा,अन्यथा तो All Talukas असाच राहू द्या.
स्टेप ७: आता आपली माहिती भरा. First Name मध्ये तुमचे नाव आणि Last Name मध्ये तुमचे आडनाव टाका.
स्टेप ८: शेवटी खाली दिलेला Captcha Code अचूक टाईप करा आणि Search बटणावर क्लिक करा.
- काय दिसते सर्च केल्यानंतर?
‘Search’ बटणावर क्लिक केल्यानंतर लगेचच स्क्रीनवर तुमचे नाव,तुमच्या मतदान केंद्राचा सविस्तर पत्ता, Part Number आणि Serial Number दिसून येईल.
- Advertisement -

