Tuesday, July 21, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तविधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा धूमधडाका; एकट्या शरद पवारांच्या ५० प्रचार सभा..

विधानसभा निवडणुकीत शरद पवारांचा धूमधडाका; एकट्या शरद पवारांच्या ५० प्रचार सभा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-विधानसभा निवडणूक काळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे ५० प्रचार सभा घेणार आहेत.१८ नोव्हेंबरला प्रचाराची सांगता सभा ही बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्यासाठी घेणार आहेत.आज,शनिवार ९ नोव्हेंबरला शरद पवार यांच्या ४ सभा होणार आहेत.धनंजय मुंडे यांच्याविरोधात आज शरद पवार यांची परळीत सभा होणार आहे. शरद पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज बीडमध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ शरद पवार मैदानात उतरणार आहेत. परळीमध्ये राजेसाहेब देशमुख,आष्टीमध्ये मेहबूब शेख,बीडमध्ये संदीप क्षीरसागर या उमेदवारांसाठी शरद पवार यांची प्रचार सभा होणार आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले असून अवघ्या ११ दिवसांत राज्यभर त्यांच्या ४२ सभा होणार आहेत.दररोज ४ सभांचे नियोजन करण्यात आले आहे.मविआच्या संयुक्त प्रचार दौऱ्यातही ते सहभागी होणार आहेत.शरद पवारांच्या सर्वाधिक सभा या पश्चिम महाराष्ट्रात होणार असल्याने अजित पवारांची चिंता वाढणार आहे. शरद पवारांनी ८७ मतदारसंघांत उमेदवार उभे केले आहेत. सर्वच ठिकाणी शरद पवारांना जाणे शक्य होणार नाही.त्यामुळे निवडक मतदारसंघांत सभांचे नियोजन करण्यात आले आहे.त्यात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ३१ उमेदवार उभे केलेत.उत्तर महाराष्ट्रात १८,मराठवाड्यात १५, विदर्भात १२ आणि मुंबई कोकण विभागात ११ मतदारसंघांत शरद पवारांनी उमेदवार दिले आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!