Friday, May 15, 2026
Homeगडचिरोलीविद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्सचे आयोजन; नोंदणी करण्याचे आवाहन..

विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्सचे आयोजन; नोंदणी करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या वतीने अनुसूचित जमातीच्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा-टीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत निवासी टीईटी क्रॅश कोर्स योजनेचे आयोजन करण्यात आले आहे.हा प्रशिक्षण कार्यक्रम येत्या,१८ मे २०२६ पासून गडचिरोली येथील इंग्लिश मीडियम स्कूल येथे सुरू होणार आहे.
या योजनेअंतर्गत महा-टीईटी परीक्षेची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या इच्छुक युवक-युवतींना अभ्यासक्रमानुसार मार्गदर्शन,गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण तसेच परीक्षाभिमुख तयारीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.आदिवासी युवक-युवतींना स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक वातावरण, मार्गदर्शन आणि निवासी सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या प्रशिक्षणासाठी गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील,जून २०२६ मध्ये होणाऱ्या महा-टीईटी परीक्षेसाठी अर्ज किंवा नोंदणी केलेले इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.अर्ज करतांना उमेदवारांनी वैयक्तिक माहिती,सामाजिक व जातविषयक माहिती,शैक्षणिक पात्रता,नोकरीचा तपशील असल्यास तो,महा-टीईटी परीक्षेसंबंधित माहिती तसेच क्रॅश कोर्स प्रशिक्षणाबाबत आवश्यक माहिती नोंदविणे गरजेचे आहे.
अर्जासाठी उमेदवारांनी आधार कार्डची प्रत आणि जून २०२६ महा-टीईटी अर्ज किंवा नोंदणी पावतीची प्रत जोडणे आवश्यक आहे.इच्छुक उमेदवारांनी यासोबतचा क्यु-आर कोड स्कॅन करून नोंदणी करावी किंवा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, गडचिरोली येथे संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी atc.ngp-mh@mah.gov.in या ई-मेलवर संपर्क साधता येईल.
गडचिरोली जिल्ह्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा,असे आवाहन आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त आयुषी सिंह यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

परवाना केवळ विक्रीचा; मात्र दुकानदारांकडे जाऊन करायचे पडताळणीची वसुली .. – जनबंधू स्केल सर्व्हिसेसचा विक्री परवाना निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इलेक्ट्रॉनिक वजन काटे विक्री व सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या जनबंधू स्केल सर्व्हिसेस, चामोर्शी या संस्थेवर वैध मापन शास्त्र विभागाने कठोर कारवाई...

पेपरफुटी प्रकरणी रद्द झालेली ‘नीट’ ची परीक्षा पुढील महिन्यात.. – परीक्षेसाठी भरलेली फी मिळणार परत; परीक्षेच्या वेळेतही १५ मिनिटांची वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या 'नीट यूजी-२०२६'(NEET-UG)ची परीक्षा नुकतीच ३ मे २०२६ रोजी देशभरातील ५५१ आणि परदेशातील १४ शहरांमधील ५ हजार...

२४ वर्षीय तरुण आणि १५ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह करण्याच्या तयारीत असतांनाच धडकले पथक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बालविवाह प्रतिबंधक कायदा २००६ नुसार अल्पवयीन विवाह हा कायदेशीर गुन्हा आहे.त्याचे गंभीर परिणाम होत असतांनाही बालविवाहाच्या तयारीत असलेल्या मंडपात चाईल्ड हेल्पलाईन...

एचटीबीटी कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूकीवर धाड; ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील रामसागर येथे संशयित अनधिकृत एचटीबीटी(HTBT) कापूस बियाण्यांची अवैधरित्या साठवणूक व विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!