- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-गडचिरोली तालुक्यातील कुरखेडा (चातगाव)येथील २५ वर्षीय गर्भवती महिला शारदा महेश मानकर वय २५ वर्षे रा.कुरखेडा (चातगाव) ता.जि.गडचिरोली ही आज शुक्रवारी ६ डिसेंबरला दुपारच्या सुमारास गावालगत शेतबांधावर धानाचा खरा करण्यासाठी गेली होती.अशातच शेतालगतच जंगल परिसर लागून असल्याने दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक शारदा हिच्यावर हल्ला चढवला. वाघाने सरळ नरडीला पकडल्याने तिने आरडा-ओरड केली.आरडा-ओरड करताच आजूबाजूला शेतात काम करणाऱ्या महिलांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलांनी धाव घेताच वाघाने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली.मात्र,वाघाने शारदा मानकर हिच्या नरडीला पकडल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती आरमोरी विधसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार रामदास मसराम यांना कळताच लगेच त्यांनी गडचिरोली वनवृत्ताचे मुख्य वनसंरक्षक एस.रमेश कुमार यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गर्भवती महिला शारदा महेश मानकर यांच्या कुटुंबीयांस तात्काळ आर्थिक मदत देण्यासंदर्भात चर्चा केली.मुख्य वनसंरक्षक एस.रमेश कुमार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात-लवकर आर्थिक मदत दिली जाणार असल्याचे सांगितले.
शारदा मानकर हीचा माहेर देसाईगंज तालुक्यातील कोकडी येथील असून शारदाच्या मृत्यूने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
- Advertisement -