Saturday, September 12, 2026
Homeगडचिरोलीलायड्स मेटल अँड एनर्जी कंपनीतर्फे स्थानिक आदिवासी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी रवाना  - विविध क्षेत्रात...

लायड्स मेटल अँड एनर्जी कंपनीतर्फे स्थानिक आदिवासी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी रवाना  – विविध क्षेत्रात प्रशिक्षण देऊन स्थानिक कर्मचाऱ्यांना मिळणार उच्च नोकरी  – एटापल्ली तालुक्यातील प्रशिक्षणा करिता पहिल्या टप्यात २०६ कर्मचारी रवाना 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

डॉ.जगदीश वेन्नम,अहेरी

गडचिरोली:- गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व अतिसंवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवर लोह खनिजाचे उत्खनन सुरू करण्यासाठी प्रशासनाला तब्बल दोन दशके वाट पहावी लागली व खनिकर्म विभागाकडून रीतसर परवानगी देण्यात आली. सुरजागड लोह प्रकल्पामध्ये चांगल्या  प्रकारचे कामगार तयार करण्याकरिता याच भागातील स्थानिक कर्मचारी यांना नवीन(उच्च )नोकरीची संधी उपलब्द करून देण्यासाठी लायड्स मेटल अँड एनर्जी लिमिटेड कंपनी मार्फत हजारो कर्मचाऱ्यांना वेगवेगळे  प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण केंद्र नागपूर येथे अग्निशमन प्रशिक्षणासाठी ३९ व हलक्या वाहतुकीसाठी ५३,प्रशिक्षण केंद्र छिंदवाडा हाटेल मॅनेजमेंट साठी २६ आणि तुमसर प्रशिक्षण केंद्रा मध्ये उत्खनन कामगार म्हणून १७,वेल्डर ५,डोझर आपरेटर १०,इलेक्ट्रीशन साठी ३१ आणि इतर २५ इत्यादी प्रकारच्या पहिल्या व दुसऱ्या टप्यातील असे एकूण २०६ प्रशिक्षणार्थीना तयार होण्यासाठी आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील गरजू युवकांना पाठविण्यात कंपनीने पाऊल उचलले आहे.पुन्हा गरज पडल्यास अनेक कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी बाहेर पाठवून त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन त्यांच्या हाताला काम देणार असल्याचे कटिबद्ध आहोत; असे कंपनी ने म्हटले आहे.

प्राप्त माहिती नुसार स्थानिक आदिवासी शेकडो  महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून  देणार असल्याची माहिती आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

नैनपूरच्या महात्मा गांधी शाळेत तान्हा पोळ्याचा अनोखा सोहळा; विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराने जिंकली उपस्थितांची मने..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षणासोबत संस्कार, संस्कृतीसोबत सामाजिक जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणाऱ्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,शुक्रवार ११...

बापरे..! तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेतून फिल्मी स्टाईलने पळवली रोकड.. – बँक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात फेकली मिरची पूड; व्हिडिओ व्हायरल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २८ वर्षीय तरुणाने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत प्रवेश करून आव-डाव पाहिला अन् बँकेतील उपस्थित कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात लाल मिरचीची पूड...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!