Sunday, July 12, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; ई-केवायसीसाठी मुदतवाढ..!

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; ई-केवायसीसाठी मुदतवाढ..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात अतिशय यशस्वीरित्या राबवली जात आहे.याबाबत १८ नोव्हेंबर २०२५ पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी ई-केवायसी(e-KYC)प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या.परंतु,गेल्या काही दिवसांत आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणींमुळे, ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील अनेक पात्र भगिनींना e-KYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही,या अडचणींची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लाडकी बहीण योजनेच्या e-KYC करण्याची अंतिम मुदत आता ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे.तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे.त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे e-kyc करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे जमा करावे.या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सातत्यता आणि अखंडितता कायम राहणार आहे.ज्या भगिनींनी अद्याप e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही,त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी,असे आवाहन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!