Friday, August 7, 2026
Homeगडचिरोलीराज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे...

राज्यातील ६ लाख २२ हजार शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटींच्या कर्जमुक्ती लाभाचे वितरण.. – आज गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांसाठी बँकांना रक्कम प्राप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार ११८ रुपयांची रक्कम आज,शुक्रवार ७ ऑगस्ट २०२६ रोजी संबंधित बँकांना प्राप्त झाली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज राज्यस्तरीय कार्यक्रमात पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या लाभाचे वितरण करण्यात आले.
या योजनेअंतर्गत राज्यात आजपर्यंत आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेल्या ६ लाख २२ हजार पात्र शेतकऱ्यांना ५ हजार २९ कोटी रुपयांचा कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला आहे.पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर लाभाची रक्कम थेट जमा करण्यात आली आहे.त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ६७१ पात्र कर्जखात्यांसाठी १५ कोटी १८ लाख ७२ हजार ११८ रुपयांची रक्कम संबंधित बँकांना प्राप्त झाली आहे.
  • कर्जमुक्तीनंतर तातडीने खरीप पीक कर्ज👇
कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना चालू खरीप हंगामातील शेतीकामांसाठी आर्थिक अडचण भासू नये,यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व बँकांना महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत.कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे,असे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत.त्यामुळे कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांना नव्याने शेतीसाठी आवश्यक आर्थिक बळ मिळणार आहे.
  • आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच उर्वरित शेतकऱ्यांनाही लाभ-जिल्हाधिकारी
योजनेच्या पहिल्या यादीत समाविष्ट असलेल्या मात्र अद्याप आधार प्रमाणीकरण पूर्ण न केलेल्या पात्र शेतकऱ्यांनी आपले आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे.संबंधित शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण होताच त्यांच्या कर्जखात्यांवरही कर्जमुक्तीच्या लाभाची रक्कम टप्प्याटप्प्याने हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी स्पष्ट केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेमुळे गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्यातून दिलासा मिळणार आहे.त्याचबरोबर कर्जमुक्तीनंतर तातडीने नवीन खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या निर्देशामुळे चालू हंगामातील शेतीकामांसाठी शेतकऱ्यांना आवश्यक आर्थिक बळ मिळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गडचिरोली जिल्ह्यात अग्निवीर भरतीसाठी तब्बल सहा ठिकाणी मार्गदर्शन मेळावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारतीय सैन्यातील अग्निवीर भरती प्रक्रियेबाबत जिल्ह्यातील इच्छुक युवक-युवतींना सविस्तर माहिती व मार्गदर्शन मिळावे,यासाठी गडचिरोली जिल्ह्यात येत्या,सोमवार १० ते १२ ऑगस्ट २०२६...

सात हजाराची लाच भोवली; महिला ग्रामसेवक एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात भंडारा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तब्बल सात हजाराची लाच घेतांना एका महिला ग्रामसेविकेस रंगेहाथ पकडले.रंजू...

मराठी भाषा विभागाचे नवीन संकेतस्थळ कार्यान्वित.. – नागरिक,विद्यार्थी व संशोधकांनी नवीन संकेतस्थळांचा वापर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागासह त्याच्या अधिनस्त कार्यालयांच्या एकूण सात संकेतस्थळांचे महाआयटी मार्फत नवीन डोमेनवर यशस्वी स्थलांतर करण्यात आले आहे.शासनाच्या धोरणानुसार...

रेशन दुकानातील मक्याचे करायचे काय? मका दळून मिळत नसल्याने लाभार्थी अडचणीत..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली(रेशन)अंतर्गत गव्हासोबत किंवा काही प्रमाणात गव्हाऐवजी मक्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र,या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!