Thursday, October 8, 2026
Homeगडचिरोलीरब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे व पीक प्रात्यक्षिकांना अनुदान; शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-सन २०२६-२७ च्या रब्बी हंगामात पिकांची उत्पादकता वाढविणे आणि सुधारित व संकरित वाणांच्या प्रमाणित बियाण्यांचा वापर वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान(अन्नधान्य पिके),कडधान्य आत्मनिर्भरता अभियान व राष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.या कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील शेतकरी, नोंदणीकृत शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषिक्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी केले आहे.
या अभियानांतर्गत मका,ज्वारी,मसूर,हरभरा,करडई आणि भुईमूग या पिकांसाठी विविध घटकांमध्ये अनुदान उपलब्ध आहे.लाभार्थ्यांची निवड ‘प्रथम अर्ज करणाऱ्यास प्रथम प्राधान्य’(एफसीएफएस)या तत्त्वावर करण्यात येईल.लाभ घेण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून फार्मर आयडी प्राप्त करणे बंधनकारक आहे.सन २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ असल्याने अधिकाधिक महिला शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
  • मका व ज्वारीच्या प्रात्यक्षिकांसाठी शंभर टक्के अनुदान👇
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत मका व ज्वारीच्या पीक प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.या घटकासाठी नोंदणीकृत शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषिक्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येतील.
प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत ज्वारीच्या १० वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाण्यांच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ३ हजार रुपये,यांपैकी कमी असलेल्या रकमेइतके अनुदान मिळेल. ज्वारीच्या १० वर्षांवरील वाणांसाठी किंमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल १ हजार ५०० रुपये,यांपैकी कमी असलेल्या रकमेइतके अनुदान देण्यात येईल. मक्याच्या १० वर्षांच्या आतील वाणांसाठी बियाण्यांच्या किंमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल १० हजार रुपये असा अनुदान दर नमूद करण्यात आला आहे.प्रमाणित बियाणे वितरणाचा लाभ घेण्यासाठी वैयक्तिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.
  • मसूर व हरभऱ्यासाठी पीक प्रात्यक्षिके आणि बियाणे अनुदान👇
कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत मसूर आणि हरभरा या पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदान उपलब्ध आहे.या प्रात्यक्षिकांसाठी नोंदणीकृत शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषिक्षेत्रात कार्यरत सहकारी संस्थांची महाडीबीटी पोर्टलवरील अर्जांच्या आधारे निवड करण्यात येईल.
प्रमाणित बियाणे वितरणांतर्गत मसूरच्या ५ वर्षांच्या आतील वाणांसाठी किंमतीच्या १०० टक्के किंवा प्रतिक्विंटल १२ हजार रुपये,यांपैकी कमी असलेल्या रकमेइतके अनुदान देण्यात येईल.मसूरच्या ५ वर्षांवरील वाणांसाठी किंमतीच्या ५० टक्के किंवा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये,यांपैकी कमी असलेल्या रकमेइतके अनुदान उपलब्ध आहे.हरभऱ्याच्या ५ वर्षांच्या आतील वाणांसाठी किंमतीच्या ७५ टक्के किंवा प्रतिक्विंटल ६ हजार रुपये,यांपैकी कमी असलेल्या रकमेइतके अनुदान मिळेल.या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
  • करडई व भुईमुगासाठीही लाभाची संधी👇
राष्ट्रीय खाद्य तेल अभियान–तेलबिया अंतर्गत करडई आणि भुईमूग या पिकांच्या प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.यासाठी नोंदणीकृत शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषिक्षेत्रात काम करणाऱ्या सहकारी संस्थांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत.
या अभियानाच्या मूल्य साखळी कार्यक्रमांतर्गत प्रमाणित बियाणे वितरणासाठी करडईला प्रतिक्विंटल १० हजार ५०० रुपये आणि भुईमुगाला प्रतिक्विंटल १२ हजार ५०० रुपये अनुदान दर निश्चित करण्यात आला आहे.या घटकासाठी वैयक्तिक शेतकरी, शेतकरी गट,शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषिक्षेत्रात कार्यरत सहकारी संस्था अर्ज करू शकतात.
  • पीक प्रात्यक्षिकांसाठी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२६ पूर्वीची आवश्यक👇
पीक प्रात्यक्षिकांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी गटाची नोंदणी ३१ मार्च २०२६ पूर्वी झालेली असावी.हा गट कोणत्याही शासनमान्य यंत्रणेकडे नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.तसेच गटातील लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅकवर नोंदणी असणे बंधनकारक आहे.
एका कुटुंबातील पती,पत्नी व अविवाहित प्रौढ अपत्य यांपैकी एकाच व्यक्तीस लाभ देण्यात येईल.प्रमाणित बियाणे वितरण घटकांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्याला आर्थिक सहाय्याचा लाभ कमाल एक हेक्टर क्षेत्रापुरता मर्यादित राहील.संबंधित बियाणे पुरवठादार संस्थेच्या वितरकामार्फत ॲग्रीस्टॅक नोंदणी व फार्मर आयडीच्या आधारे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर बियाणे वितरणाचा लाभ देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील पात्र शेतकरी आणि संस्थांनी “महाडीबीटी शेतकरी पोर्टल” (https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin) येथे अर्ज करावेत. अनुदानाचे घटक,पात्रता आणि अर्जप्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सिने सृष्टीवर शोककळा; ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन.. – ज्येष्ठ अभिनेते आणि माझे निकटचे मित्र नाना पाटेकर यांची अशी अकाली आणि अचानक ‘एक्झिट’...

उद्रेक न्युज वृत्त :-ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे आज,गुरुवार ८ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास वयाच्या ७५ व्या वर्षी गोव्यात निधन झाले.गोव्यातील डोना पौला येथील...

महाराष्ट्रातील गंभीर दुष्काळी परिस्थितीबाबत केंद्र सरकारकडून विशेष मदतीची मागणी; मुख्यमंत्र्यांनी घेतली अमित शाह यांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  नवी दिल्ली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यात आज,बुधवार ७ ऑक्टोंबरला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.या भेटीत...

नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोलीच्या महाराष्ट्र व छत्तीसगडच्या नारायणपूर सीमेलगत असलेल्या भामरागड तालुक्यातील कोपर्शी जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रसाठा व स्फोटक साहित्ये गडचिरोली पोलिसांनी...

पोलीस उपनिरीक्षकाने राहत्या घरीच संपवले जीवन..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-एका पोलीस उपनिरीक्षकाने आपल्या राहत्या घरी बंदुकीतून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली.निलेश भाऊसाहेब पाटील वय ५५ वर्षे असे मृत पोलिस उपनिरीक्षकाचे नाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!