Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीयुवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा यवतमाळ येथे सत्कार..

युवा कवी प्रभाकर दुर्गे यांचा यवतमाळ येथे सत्कार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणाऱ्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच(डिबीए)महाराष्ट्र रत्नागिरी,या साहित्यिक संस्थेच्या वतीने व यवतमाळ जिल्हा कमिटीच्या वतीने डिबीएचा पाचवा वर्धापन दिन तसेच काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा व राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभ आणि राज्यस्तरीय कवी संमेलन यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथे डिबीएचे संस्थापक मनोज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच २५ ऑक्टोंबर रोजी पार पडला. यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष युवा कवी प्रभाकर देविदास दुर्गे(छायासूत)हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या विचारमय लेखणीतून “चला मानसांनो… माणुसकी समजून घेऊ” अशी मानव जातीला प्रकाशमय करणारी,समाजाला प्रेरणादायी कविता सादर करत उपस्थित सर्व मान्यवर,साहित्यिक,रसिकांची मने जिंकली.त्यांचे कवितांच्या माध्यमातून सामाजिक योगदान तसेच साहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल आयोजक,प्रायोजकांनी घेऊन दुर्गे यांचा
सन्मानचिन्ह,सन्मानपत्र,पुस्तक व मानाचा पट्टा देऊन डिबीएचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा संस्थापक मनोज जाधव, डिबीएच्या आधारस्तंभ/संपादिका भावना खोब्रागडे, कवी संमेलनाध्यक्षा प्रतिभा गेडाम,यवतमाळ जिल्हाध्यक्षा संध्या खरतडे,यवतमाळ जिल्हा उपाध्यक्षा कुसुमताई मनवर,यवतमाळ जिल्हा सचिव संगीता कानिंदे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या या सत्काराबद्दल साहित्यिक सहकारी, मित्रपरिवार,गाववासीय,आप्तजन या सर्वांकडून  अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जनगणनेत ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसल्यास देशव्यापी आंदोलनाचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आगामी जनगणनेमध्ये इतर मागासवर्गीय(OBC)समाजाची स्वतंत्रपणे नोंद होण्यासाठी स्वतंत्र कॉलम उपलब्ध करून द्यावा,अशी मागणी ओबीसी समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.यासंदर्भात संघटनेने देशाचे...

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!