उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- केंद्र शासनाच्या पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान योजना लागू केली.या योजनेला मंजुरी मिळून निधीसुद्धा उपलब्ध झाला आहे. आता शेतकरी बांधवांना दिवाळीपूर्वी निधीचे वाटप होणार आहे.
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी देण्याची घोषणा केली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तब्बल चार हजार रुपये जमा होणार आहेत.
शेतकऱ्यांना आर्थिक मदत होण्याच्या अनुषंगाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान योजना व राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना सुरू केली आहे.दिवाळीपूर्वी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता तर नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचे अनुदान तर राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधीचे सहा असे एकूण १२ हजार रुपये वर्षाला शेतकऱ्यांना मिळणार आहेत.