Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोली‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे 'या' ॲपवर करता येणार अर्ज…

‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ योजनेचे ‘या’ ॲपवर करता येणार अर्ज…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांचे आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे, तसेच कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी शासनाने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली आहे.या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यात येणार आहे.जिल्ह्यातील महिलांनी १५ जुलै पूर्वी अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पहिला टप्प्यात १ ते १५ जुलै या कालावधीत लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात येत आहे.यासाठी पात्र महिला अंगणवाडी सेविका,ग्रामसेवक,परिवेक्षिका, मुख्यसेविका,सेवा सुविधा केंद्र यांच्या सहाय्याने अर्ज करू शकतात.यांनतर या प्रतिनिधींनीमार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज शासनास सादर होतील. तसेच ज्या महिला स्वत: ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात त्यांच्यासाठी ‘नारी शक्ती दूत’ हे ॲप सुरू करण्यात आले आहे.

लाभार्थी पात्रता👇

१) वय २१ ते ६० वर्षे असणारी महिला. २) महाराष्ट्र राज्याची रहिवासी महिला. ३) विवाहित, विधवा, घटस्फोटित परित्यक्त्या, निराधार महिला. ४) कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लक्ष पेक्षा कमी असणे गरजेचे.

अपात्रता👇

१) कुटुंबातील सदस्य आयकर दाता असल्यास, २) सरकारी नोकरी,३) आजी/माजी आमदार/खासदार ४) कुटुंबाच्या मालकीची ५ एकर पेक्षा जास्त जमीन असणारे, ६) चार चाकी गाडी असणारे.

अर्ज करण्याची पद्धत👇

अर्ज नि:शुल्क अंगणवाडी सेविका यांचेकडे भारता येईल. अर्ज विहित नमुन्यात भरून व त्याला आवश्यक कागद जोडून अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, सेतू केंद्र, वार्ड अधिकारी यांना देता येईल. वरील सर्वांकडून अर्ज ऑनलाईन भरून घेता येईल. लाभार्थ्याला स्वत: ‘नारी शक्ती दूत’ हे ॲपवर अर्ज करता येईल. 

आवश्यक कागदपत्रे👇

योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज, लाभार्थ्याचे आधारकार्ड, महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र / महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 2.50 लाखांपर्यंत असावे), बँक खाते पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत, पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशनकार्ड, सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र

अडचणी असल्यास येथे करा संपर्क👇

अर्ज भरतांना काही समस्या असल्यास नजिकच्या अंगणवाडी केंद्रावर तसेच महिला हेल्प लाईन 181 वर संपर्क करावा; असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!