उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समीती गडचिरोली च्या वतीने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,आपल्या पाल्यांचा प्रवेश आजच जिल्हा परिषद शाळामध्ये करावा;
जिल्हा परिषद शाळेची वैशिष्ट्ये :-
● विद्यार्थ्यांना निशुल्क मोफत प्रवेश
● मोफत पाठ्यपुस्तके
● मोफत २/२ गणवेश व शासकीय योजनांचा लाभ
● सकस शालेय पोषण आहार; मध्यान्ह भोजन योजना
● पुरक आहार योजना
● सर्व शासकीय योजना
● मुल्यधिष्ठीत/ मुल्यशिक्षणावर आधारित अभ्यासक्रम
● दरवर्षी मोफत आरोग्य तपासणी
● Slas /Nas सारख्या स्पर्धा परीक्षेचे आयोजन_
● सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती योजना
● उपस्थिती भत्ता
● तज्ञ वीस ते पंचवीस वर्षे अनुभवी असलेले प्रशिक्षित शिक्षक वर्ग
● विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम व मोबाईल टँबवर डिजिटल शिक्षण
● विद्यार्थ्यांना वाचन सरावासाठी सुसज्ज ग्रंथालय
● प्रशस्त शाळेचे मोठे मैदान व निसर्ग रम्य वातावरण
● मुबलक क्रीडा साहित्य
● प्रत्येक बालकाचा त्याच्या क्षमता बघून सर्वांगीण विकास
● वर्षभरात विविध शैक्षणिक उपक्रम सर्व महापुरुषांच्या जयंती,पुण्यतिथी,संस्कारक्षम परिपाठ,सांस्कृतिक कार्यक्रम,वेशभूषा स्पर्धा,क्रीडा स्पर्धा,शारीरिक शिक्षण,निसर्ग सहल,पाढे पाठांतर स्पर्धा यासारखे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम
● शाळेला जोडूनच इयत्ता पाचवी ते दहावी वर्गापर्यंत प्रशालेत सोय असल्याने सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की,आपल्या पाल्याचा प्रवेश आजच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतच करावा.
आपले विनीत
महाराष्ट्र राज्य प्राथमिक
शिक्षक समिती गडचिरोली.