Tuesday, September 8, 2026
Homeगडचिरोलीमधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

मधमाशी पालन केंद्र योजना; ५० टक्के अनुदानासह मधाला हमीभावाची सुविधा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून शेतकरी व युवकांना शाश्वत उत्पन्नाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत ‘मध केंद्र'(मधमाशी पालन)योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.शेतीला पूरक जोडधंदा म्हणून मधमाशी पालनाला चालना देत ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याच्या उद्देशाने ही योजना राज्यभर राबविण्यात येत असून,पात्र लाभार्थ्यांना प्रशिक्षण,अनुदान आणि उत्पादित मधासाठी हमीभावाची सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे.
या योजनेअंतर्गत वैयक्तिक मधपाळ,केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ)आणि केंद्र चालक संस्था अशा तीन गटांमध्ये लाभ दिला जातो.निवड झालेल्या लाभार्थ्यांना मधमाशी पालन व्यवसायाचे मोफत प्रशिक्षण देण्यात येते.तसेच मधपेट्या,मध काढण्याची यंत्रे आणि इतर आवश्यक साहित्य खरेदीसाठी ५० टक्के शासकीय अनुदान उपलब्ध करून दिले जाते.
या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे उत्पादित मधासाठी शासनाकडून हमीभाव निश्चित करण्यात आला आहे.त्यामुळे उत्पादकांना बाजारपेठ शोधण्याची किंवा विक्रीची चिंता न करता उत्पादनावर भर देता येतो.यामुळे मधमाशी पालन हा व्यवसाय ग्रामीण भागातील शेतकरी व युवकांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आणि शाश्वत रोजगाराचा पर्याय ठरत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे असणे आवश्यक आहे.वैयक्तिक मधपाळ गटासाठी किमान साक्षरता अपेक्षित असून स्वतःची शेती असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.निवड झालेल्या लाभार्थ्यांनी प्रशिक्षण सुरू होण्यापूर्वी आवश्यक ५० टक्के स्वगुंतवणुकीची रक्कम मंडळाकडे जमा करणे बंधनकारक आहे.
या योजनेची सविस्तर माहिती व अर्ज प्रक्रियेसाठी इच्छुक शेतकरी,युवक आणि संस्थांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ,गडचिरोली येथील कार्यालयाशी संपर्क साधावा.अधिक माहितीसाठी भास्कर मेश्राम, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी तसेच हेमंत राऊत, मधुक्षेत्रिक(मो.८४५९१६०६०४) यांच्याशी संपर्क साधता येईल.
जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी,बेरोजगार युवक तसेच स्वयंसेवी संस्थांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन मधमाशी पालन व्यवसायाद्वारे स्वावलंबी होण्याचे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!