Sunday, May 3, 2026
Homeरांचीमंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरावर छापा…-रोकड मोजण्यासाठी बोलावण्यात आल्या नोटा मोजण्याच्या मशीन..

मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या नोकराच्या घरावर छापा…-रोकड मोजण्यासाठी बोलावण्यात आल्या नोटा मोजण्याच्या मशीन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

रांची :- देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना झारखंडची राजधानी रांचीमध्ये सक्तवसुली संचलनालयाचे (ईडी) धाडसत्र सुरु आहे.मंत्री आलमगीर आलम यांच्या स्वीय सचिवाच्या नोकऱ्याच्या घरावर छापा टाकण्यात आला.त्यात मोठ्या प्रमाणात रोकड हाती लागली आहे.प्राथमिक माहितीनुसार,ईडीच्या हाती जवळपास २५ कोटी रुपयांची रोख रक्कम लागली आहे.मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात आलमगीर आलम यांचं नाव समोर आलं होतं. त्यानंतर ईडीनं तपास सुरु केला.

आलमगीर आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरु असल्याची माहिती ईडीला मिळाली होती. भ्रष्टाचाराचा पैसा नोकरांच्या घरी जात असल्याची टिप ईडीच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर मंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या नोकराच्या घरी छापा टाकण्यात आला.या नोकराला दरमहा १५ हजार रुपये पगार मिळतो.पण त्याच्या घरी कुबेराचा खजिना सापडला.घरात सापडलेली रोकड मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या मशीन मागवण्यात आल्या.

गेल्या वर्षीच्या मे महिन्यात मुख्य अभियंत्याच्या घरावर १० हजारांच्या लाच प्रकरणी छापा टाकला होता. त्यावेळी त्याचा जबाब नोंदवण्यात आला. मंत्र्यांकडे लाचेचा पैसा कसा पोहोचवला जातो याची इंत्यभूत माहिती त्यानं दिली. त्यानंतर झारखंडचे ग्राम विकास मंत्री आलमगीर आलम यांचं नाव पहिल्यांदा भ्रष्टाचार प्रकरणात समोर आलं. या प्रकरणाचा तपास सुरु असताना आलमगीर यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांचं नाव समोर आलं. संजीव लाल यांच्याकडे घरकाम करणाऱ्या नोकराच्या घरावर धाड टाकण्यात आली. तेव्हा तिथे कोट्यवधींची रोकड सापडली.

आलमगीर आलम पाकुड विधानसभेचे काँग्रेसचे आमदार आहेत. ते चार टर्मचे आमदार आहेत. सध्या त्यांच्याकडे झारखंड सरकारमध्ये संसदीय कार्य आणि ग्राम विकास मंत्रालयाची जबाबदारी आहे. त्याआधी २० ऑक्टोबर २००६ ते १२ डिसेंबर २००९ या कालावधीत ते विधानसभेचे अध्यक्ष राहिले आहेत. सरपंच पदाची निवडणूक जिंकून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.२००० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. आतापर्यंत ते चारवेळा विधानसभा निवडणूक जिंकले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ताडोबात आढळले ४२ वाघ आणि १३ बिबटे; तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चंद्रपूर जिल्ह्याच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात बुद्ध पौर्णिमेनिमित्त नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक 'मचान गणना' उपक्रमात तब्बल ५ हजार ७६५ वन्यजीव दर्शनांची नोंद...

एसीचा स्फोट; ९ जणांचा होरपळून मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राजधानीत आज,रविवार ३ मे रोजी पहाटेच्या सुमारास एका निवासी इमारतीत भीषण आगीची घटना उघडकीस आली असून भीषण आगीत तब्बल ९...

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!