Tuesday, October 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तमंत्री आला तर मतदारांना लाथ मारणार; 'त्या' पोलीस उपअधीक्षकाला देखील लाथ मारली...

मंत्री आला तर मतदारांना लाथ मारणार; ‘त्या’ पोलीस उपअधीक्षकाला देखील लाथ मारली पाहिजे.. – बच्चू कडू संतापले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-जालना शहरातील कदीम जालना पोलीस ठाण्यात पत्नीने परस्पर दुसरे लग्न केल्याच्या आरोपावरून व कौटुंबिक वादातून दाखल गुन्ह्याबाबत आंदोलक अमित चौधरी आणि गोपाल रमेश चौधरी गेल्या महिन्याभरापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करत आहेत.पोलिस आरोपींना पाठिशी घालून फिर्यादींना त्रास देत असल्याचा त्यांचा आरोप आहे.स्वातंत्र्यदिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे जालन्यात गेल्या होत्या. पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या भेटीसाठी त्यांनी ताफा अडवण्याचा प्रयत्न केला,परंतु पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना यश आले नाही.त्यातच आंदोलन कर्त्याला पकडुन नेत असतांनाच पोलीस उपअधीक्षक(डीवायएसपी)अनंत कुलकर्णी यांनी मागून धावत जात बुटांसह सिनेस्टाईलने अमित चौधरी या आंदोलकाच्या कंबरेत लाथ मारली.आंदोलन कर्त्याला लाथ मारल्याने समाज माध्यमांवर घटनेचे तीव्र पडसाद उमटू लागले.प्रकरणी पोलीस उपअधीक्षक अनंत कुलकर्णी यांचेवर कारवाईची मागणी केली जात आहे.अश्यातच आज,रविवार १७ ऑगस्ट रोजी प्रहार संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू हे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांनी जालना शहरात घडलेल्या प्रकाराविषयी तीव्र शब्दात संताप व्यक्त केला आहे.त्यांनी माध्यमांशी बोलतांना म्हटले की,डीवायएसपीला देखील लाथ मारली पाहिजे,त्या डीवायएसपीच्या ढुंगणावर आम्ही लाथ मारू,असे म्हणत बच्चू कडू यांनी जालन्यातील व्हायरल व्हिडिओवर आपली प्रतिक्रिया दिली.मंत्री आला तर मतदारांना लाथ मारणार,निवडणूक आली तर त्यांच्या घरापर्यंत जाणार.पंकजा मुंडेंना देखील हे समजायला हवे होते,पंकजा मुंडेंनी देखील निषेध व्यक्त करायला हवा होता,असे म्हणत पंकजा मुंडेंनाही बच्चू कडूंनी टोला लगावला.जगाच्या पाठीवर हुशार असलेले आमचे मुख्यमंत्री ते स्वतः गृहमंत्री देखील आहेत,त्यांचे पोलीस असे वागत असेल तर…पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईने काही होणार नाही,त्या शेतकऱ्याकडून त्या डीवायएसपीच्या ढुंगणावर लाथ मारली पाहिजे,अशा शब्दात बच्चू कडूंनी आपला संताप व्यक्त केला.पुढे बोलतांना म्हणाले की,निवडणूक आयोग तुमचा मित्र झाल्यामुळे तुम्हाला मस्ती आली असून,हे सर्व ईव्हीएम मशिनचे पहिलवान आहेत.ईव्हीएम व ‘ईडी’चा प्रकार भाजपने ताब्यात घेतलेल्या संस्था आहेत,त्यांचा जसा म्हणाल तसा वापर सुरू असून,संविधानाची चिरफाड सुरू आहे.ते म्हणतात लोकशाही आहे,मात्र ही भाजपची हुकूमशाही राहणार,अशी अवस्था आणून ठेवली आहे, अशा शब्दांत प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी सरकारवर प्रहार करत जहरी टीका केली.नाशिक जिल्ह्याच्या येवल्यात आलेल्या कडू यांनी पत्रकाराशी संवाद साधत आपली भूमिका मांडली.आगामी निवडणुका लढाव्यात की नाही,हा विचार येतोय.मला वाटते भाजपच्या कार्यालयातूनच मतदान झाले पाहिजे,मतदान केंद्र सर्व संपवले पाहिजे,भाजपच्या कार्यालयामध्ये मतपेट्या ठेवून त्यांनीच बटण दाबावे,माझ्या मतदारसंघात १३ हजार नावे दुबार सापडली आहेत.सरकारी शाळांमध्ये मतदान केंद्र न ठेवता भाजपच्या कार्यालयांमध्ये मतदान केंद्र ठेवावे,अशी टीका करत लोकशाहीचे पतन करण्याचे काम जर सुरूच राहणार असेल, तर आम्ही निवडणूक आयोगाला एक पत्र देणार आहेत,असेही त्यांनी सांगितले.तुमच्यात धमक असेल,तर व्हीव्हीपॅट येतो तो आमच्या हाती द्या,आम्ही त्यावर सही करून मतपेटीत टाकतो.तुमची मर्दानगी असेल,तर हे करून पाहा,मग कोण जिंकेल ते कळेल,अशीही टीका बच्चू कडू यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२७ वर्षीय तरुणाने गळफास घेत संपवली जीवनयात्रा; आज सकाळची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या नगर परिषद हद्दीत येणाऱ्या नैनपूर येथील एका २७ वर्षीय तरुणाने घरी कुणीही नसतांना स्वतःच्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना...

नागपूर पदवीधर मतदारसंघात कोण मारणार बाजी? राजकीय वर्तुळात उत्सुकता..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज,मंगळवार २७ ऑक्टोंबरला जाहीर होणार असून अभिजीत वंजारी वर्सेस सुधाकर कोहळे यांच्यापैकी कोण बाजी मारणार,याबाबत...

सावंगीच्या जिल्हा परिषद शाळेत एमएसडब्लू विद्यार्थ्यांचे क्षेत्रकार्य संपन्न; विविध उपक्रमांतून सामाजिक जागृती..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-अनिकेत समाजकार्य महाविद्यालय देसाईगंज येथील एमएसडब्लू(MSW) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावंगी येथे २१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोंबर २०२६...

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!