- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-प्रत्येक निवडणुकीत उच्छाद मांडणाऱ्या नक्षलवाद्यांनी निवडणुकीवर यावेळी बहिष्कार टाकण्यासोबतच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा अहेरी मतदारसंघातील विधानसभा महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम यांना ‘टार्गेट’ करण्याची धमकी दिली आहे.नक्षलवादी आगामी काळात हिंसात्मक कृतींवर उतरण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.अहेरी भागातील जिमलगट्टा परिसरात नक्षलवाद्यांनी बॅनर्स लावून याबाबत आपले ‘उलगुलान’ केल्याचे दिसून येत आहे.
नक्षल्यांच्या बॅनर्समध्ये विविध बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.यामध्ये प्रामुख्याने मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यावर व महायुती सरकारवर टीकाटिप्पणी करण्यात आली आहे.पीपल्स लिबरेशन गुरील्ला आर्मी अर्थात पीएलजीएचा सप्ताह २ ते ७ डिसेंबर या कालावधीत पाळण्यात यावा,याचकाळात भारत बंद ठेवावा,असे आवाहन नक्षल्यांनी बॅनरमधून केले आहे.भाजप सरकारचा निषेध करीत कंत्राटदारांनी विकासकामे बंद करावीत.सर्व गाव पोलिस पाटलांनी राजीनामा द्यावा,मंत्री आत्राम यांचा निषेध करावा,असे आवाहन नक्षलवाद्यांनी बॅनर्समधून केले आहे.पोलिसांच्या वाढत्या कारवायांमुळे बॅकफूटवर गेलेले नक्षलवादी आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर सक्रिय झाल्याने पोलिसांच्या अडचणीत वाढ झाली आहे.अहेरी एरिया कमिटी अशा आशयाचे हे बॅनर्स अहेरी उपविभागात लावण्यात आल्याने उमेदवारांचीही धाकधूक वाढली आहे.
- Advertisement -