उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- जिल्ह्यातील बारावीमध्ये ७५%,दहावी मध्ये ८०% तसेच स्कॉलरशिप पास,जवाहर नवोदय विद्यालय परीक्षा पास,यूपीएससी,एमपीएससी परीक्षा पास,नव्याने ASI,PSI पोलिस पदोन्नती,शासकीय सेवेत रुजू,स्पोर्ट्स मद्ये प्रावीण्य व इतर कार्यात,सेवेत, समाजाचे नाव उज्वल करणाऱ्या समाज बांधवांचा व विद्यार्थांचा जाहिर सत्कार सोहळा गडचिरोली जिल्हा कामगार काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष छगन शेडमाके यांच्या वतिने घेण्यात येणार आहे.सदर सत्काराची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे शेडमाके यांनी म्हटले आहे.

