Saturday, September 26, 2026
Homeगडचिरोलीबस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक इम्रान शेख हे गंभीररीत्या जखमी झाले,तर त्यांच्या पत्नी व मुले सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.ही
घटना काल शुक्रवारच्या सायंकाळी पोर्ला गावाजवळ घडली.
माहितीनुसार,इम्रान शेख हे एमएच ३१ जीए ७८६३ क्रमांकाच्या कारने कुटुंबीयांसह चामोर्शी येथे  कौटुंबिक कार्यक्रमाला जाण्यासाठी निघाले होते.प्रवास सुरू असतांनाच गडचिरोलीपासून सुमारे १५ किलोमीटर आधी गडचिरोलीहून देसाईगंजकडे निघालेली एसटी बस आणि कारची समोरासमोर जोरदार धडक झाली.धडक इतकी भीषण होती की,कारचा पुढील भाग मोठ्या प्रमाणात क्षतिग्रस्त झाला.या अपघातात इम्रान शेख गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढण्यासाठी मदत केली.त्यानंतर,जखमींना तातडीने गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.इम्रान शेख यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती आहे.इंटरनल ब्लीडिंगच्या शक्यतेने डॉक्टरांकडून तपासणी आणि उपचार करण्यात आले.मात्र,त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना नागपूरला हलवण्यात आले.त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखी खाली उपचार सुरू आहेत.दरम्यान,भीषण अपघातामुळे गडचिरोली-देसाईगंज मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

धक्कादायक..! धावत्या ट्रेनवर दगडफेक; काचांचे तुकडे प्रवाशांच्या जेवणात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.दगडफेकीत ट्रेनच्या एसी कोचच्या खिडक्यांच्या काचा फुटून काचांचे तुकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!