Wednesday, September 30, 2026
Homeअमरावतीबसच्या धडकेत ९ वर्षीय मुलगा ठार; तिघेजण जखमी -संतप्त जमावाने बसची केली...

बसच्या धडकेत ९ वर्षीय मुलगा ठार; तिघेजण जखमी -संतप्त जमावाने बसची केली तोडफोड…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

अमरावती :-भरधाव सिटी बसच्या धडकेत एका ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना आज,रविवारी दुपारी अमरावती शहरात घडली आहे.या घटनेत मृत मुलाच्या आजीसह अन्य २ जण गंभीर जखमी झालेत.अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानालगत ही घटना घडली आहे.प्रीतम गोविंद निर्मळे असे बसखाली चिरडून ठार झालेल्या ९ वर्षीय मुलाचे नाव आहे.

वृत्तानुसार,शिरसगाव कसब्यातील एक ६० वर्षीय नर्मदा निर्मळे या प्रीतम तथा वैष्णवी संजय निर्मळे वय १४ वर्षे व नेहा संतोष निर्मळे या २ नातींसोबत सायन्स कोर्सच्या बस डेपो परिसरातून पायी जात होत्या.रस्त्यात त्यांना एका सीव्हीसी बसने जोराची धडक दिली.ही धडक एवढी जोरात होती की,९ वर्षीय प्रीतमचा बसच्या मागच्या चाकाखाली येऊन जागीच मृत्यू झाला.

या घटनेत नर्मदा निर्मळे यांच्यासह दोन्ही नाती गंभीर जखमी झाल्या आहेत.त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून अपघातानंतर संतप्त जमावाने बसची तोडफोड केली.नागरिकांचा रोष लक्षात घेता सायन्सकोर मैदान परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला.मृत मुलाचा मृतदेह पुढील कारवाईसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला.सध्या परिसरात शांतता असून, पोलिस हा अपघात नेमका कशामुळे झाला? याचा तपास करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

कुष्ठांतेयांची तालुका स्तरावर ११ सदस्यीय कार्यकारिणी गठित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,भिसी येथे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या माध्यमातून २८ सप्टेंबर रोजी कुष्ठांतेयांची सभा आयोजित करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी...

सावधान..! वनविभागातील नोकरीचे आमिष पडू शकते महागात.. – वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांची भरती आणि नियुक्ती शासनाच्या विहित नियमांनुसारच..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील विविध भागांत काही व्यक्ती वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांवर नियुक्ती करून देण्याचे खोटे आमिष दाखवून उमेदवारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!