Thursday, June 25, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तफाशीची शिक्षा देण्याच्या पारंपरिक 'गळफास' पद्धतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान..

फाशीची शिक्षा देण्याच्या पारंपरिक ‘गळफास’ पद्धतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या भारतात काही प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला फाशीची शिक्षा देण्याची पारंपरिक ‘गळफास’ पद्धत आहे.भारतीय फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (CrPC)कलम ३५४ (५)नुसार, “मानेला फास लावून मृत्यू येईपर्यंत लटकवणे” ही एकमेव पद्धत रूढ आहे. गुन्हेगाराला मृत्यू घोषित करण्यासाठी ४० मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागू शकतो,जो अत्यंत वेदनादायी आणि अमानवीय असल्याने फाशीची शिक्षा देण्याच्या पारंपरिक ‘गळफास’ पद्धतीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.अमेरिकेतील ५० पैकी ४९ राज्यांनी गळफास देण्याची पद्धत बंद करून ‘लेथल इंजेक्शन’ चा (Lethal Injection)स्वीकार केला आहे.इंजेक्शनद्वारे मृत्यूची प्रक्रिया अवघ्या पाच मिनिटांत पूर्ण होते,तर गोळीबाराद्वारे यात काही मिनिटे लागतात. “कमीतकमी गुन्हेगाराला गळफास किंवा इंजेक्शन यापैकी एक पर्याय तरी निवडण्याची संधी द्या,” अशी मागणी याचिकाकर्ते ऋषी मल्होत्रा यांनी केली आहे.भारतीय सशस्त्र दलांमध्ये आधीच अशा प्रकारचे पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.फाशी देण्याची प्रक्रिया केवळ गुन्हेगारासाठीच नाही,तर ती पार पाडणाऱ्यांवर आणि प्रत्यक्ष पाहणाऱ्या साक्षीदारांवरही खोलवर ‘मानसिक परिणाम’ करते.ही दृश्ये अत्यंत अस्वस्थ करणारी असतात,असे निरीक्षण न्यायमूर्ती संदीप मेहता यांनी नोंदवले.तर आधुनिक युगात फाशीऐवजी कमी वेदना देणारे पर्याय शोधण्याची गरज आहे; असे मत याचिकाकर्त्याने मांडले.न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने या संवेदनशील विषयावर नुकतीच सुनावणी पूर्ण केली असून आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!