उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पतसंस्थेत वा इतर ठिकाणी गुंतवणूक करतांना सर्वप्रथम चौकशी करणे आवश्यक आहे. पैश्याच्या बाबतीत कधी कुणाची केव्हा मनस्थिती बिघडेल व रक्कम घेऊन पोबारा करेल याचा नेम नाही असाच प्रकार विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील एजांटाने भरपूर व्याजासह परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांकडून ठेवींच्या माध्यमातून गोळा केलेली जवळपास ६७ लाखाची रक्कम घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
विजया महिला नागरी सहकारी पतसंस्थेतील एजंट मंगेश नरड याने नवेगाव येथील १० नागरिकांकडून राष्ट्रीयकृत बँकेपेक्षा अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून दैनंदिन ठेवीसह फिक्स डिपॉझिट म्हणून जवळपास ६७ लाखांची रक्कम गोळा केली.रक्कम तर गोळा केली; मात्र काही गुंतवणकादारांना पैशाची गरज पडली.पतसंस्थेत काही नागरिक गेले असता, गोळा केलेल्या रकमेची पतसंस्थेत नोंदच नसल्याचे उघड झाल्याने सदर प्रकरण चव्हाट्यावर आला आहे.
नागरिकांना आपली फसवणूक झाल्याचे कळताच संबंधितांनी गडचिरोली पोलिस ठाण्यात २० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली.एजंट मंगेश विरोधात भादंवि ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४७१ कलमान्वये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सद्यस्थितीत एजंट मंगेश नरड फरार आहे.