Monday, June 22, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपत्नी दारू पिते म्हणून क्रूरता ठरत नाही- उच्च न्यायालय

पत्नी दारू पिते म्हणून क्रूरता ठरत नाही- उच्च न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नव्या युगाची नवी पिढी,पती दारू पितो तर पत्नीने कां बर दारू पिऊन पतीसारखे वर्तन करू नये,असाच प्रकार पती-पत्नीच्या घटस्फोट प्रकरणात उघडकीस आला आहे.नुकतेच एका पती- पत्नीच्या घटस्फोटासंदर्भातील प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवून पत्नी दारू पिते म्हणून ती क्रूर कार्य करते,असा त्याचा अर्थ होत नाही.जोपर्यंत पत्नीकडून दारू पिऊन पतीसोबत अभद्र किंवा अनुचित प्रकार घडत नाही; तोपर्यंत ती क्रुरता ठरत नाही; असे मत उच्च न्यायालयाने नोंदवले. पतीने पत्नीवर आरोप केले की,मला न सांगता घरून बाहेर जाते.रात्री बेरात्री दारू पिऊन येते व मित्रांसोबत वेळ घालवत असते,पत्नीकडून माझ्यावर क्रूरते सारखा व्यवहार केला जातो आहे.असे कारण देत पतीने घटस्फोटासाठी अर्ज केला होता.त्यानुसार अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश विवेक चौधरी आणि न्या.ओमप्रकाश शुक्ला यांच्या खंडपीठात याप्रकरणी सुनावणी झाली.त्यामध्ये, क्रूरता आणि परित्याग दोन्ही गोष्टी एकमेकांपासून विभिन्न आहेत.तसेच,न्यायालयात ही बाब कुठेही सिद्ध झाली नाही की,दारु पिणे ही क्रूरता आहे किंवा दारु पिल्याच्या कारणास्तव जन्मलेल्या मुलांमध्ये कुठलेही शारीरिक व्यंग आहे,किंवा प्रकृती स्वास्थ ठीक नाही. याशिवाय पत्नीला आलेले फोन कॉल्स हे पुरुष मित्राचेच आहेत,याचे कुठेही रेकॉर्ड नाही किंवा ज्यामुळे पतीसोबत क्रूरपणाचे वर्तन झाल्याचे सिद्ध होते,असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. त्यानुसार न्यायालयाने घटस्फोट मंजूर केला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

देसाईगंज पोलिसांची धडक कारवाई; दारु तस्कराच्या आवळल्या मुसक्या.. – सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यातील दारु विक्रिवर प्रतिबंध लावण्यासाठी देसाईगंज पोलिसांनी धडक मोहिम हाती घेतली असुन एका दारु तस्कराच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे....

विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी एकलव्य व आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे क्रीडा,विज्ञान व कला क्षेत्रात करणार मॅपिंग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत आश्रमशाळा व एकलव्य मॉडेल निवासी विद्यालयांमधील विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांच्या क्रीडा,विज्ञान तसेच कला व संस्कृती...

कर्जफेडीसाठी दिलेला चेक बाऊन्स; दोषीला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-एका बँकेकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड करण्यासाठी दुसऱ्या बँकेचा चेक दिला खरी, पण जो चेक देण्यात आला,त्या बँकेच्या खात्यात पुरेसे पैसेच...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!