Monday, August 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तपत्नीच्या छळ प्रकरणी तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांना अटक..

पत्नीच्या छळ प्रकरणी तहसीलदार अविनाश शेंबटवाड यांना अटक..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा तहसील येथे कार्यरत तहसीलदार अविनाश श्रीराम शेंबटवाड यांना नांदेड पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवार १२ एप्रिल रोजी पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ करत पत्नीवर बंदूक ताणून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक केली आहे. शेंबटवाड याच्यासह त्याच्या नातेवाईकांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेंबटवाड यांचे दोन वर्षापूर्वी नांदेडमधील मगनपुरा परिसरात राहणाऱ्या तरुणीसोबत लग्न झाले.पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार,लग्नात पत्नीला माहेरून २५ तोळे सोने देण्यात आले होते.त्यानंतर तगादा लावून शेंबटवार याने पत्नीच्या आई-वडिलांकडून ७५ लाख रुपये घेतले.यानंतरही पीडितेचा त्रास सुरूच होता.पत्नीला मारहाण करणे,जादूटोणाचा वापर करणे,पिस्तुल रोखून जीवे मारण्याचा प्रयत्न करणे,विविध प्रकारे छळ करणे हे प्रकार सुरुच होते.अखेर या त्रासाला कंटाळून पीडिता नांदेड येथे आपल्या घरी गेली.यानंतर ११ मार्च रोजी पीडितेच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी तहसिलदार विरोधात गुन्हा दाखल केला.दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये भारतीय दंड संहितेची कलमे ४९८ (अ),३०६,३५४, ५०६(२), ३२३,५०९,५०४,५०६,३४ सोबतच भारतीय न्याय संहितेतील कलमे ८५,१०९,७४,३५१(३),११५(२), ७९,३५२,३५१(२), ३(५) यासह भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ आणि नरबळी व इतर अमानुष,अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी व त्यांचे समुळ उच्चाटन करण्याबाबतचा अधिनियम २०१३ मधील कलम ३(२) जोडलेली आहेत.अशातच शनिवारी १२ एप्रिलला तहसिलदार पीडितेच्या घरी गेला.याची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक जालिंदर तांदळे आणि त्यांचे अनेक सहकारी पोलीस अधिकारी,पोलीस अंमलदार,महिला पोलीस अंमलदार यांनी तहसीलदार अविनाश श्रीराम शेंबटवाडला मगनपुरा भागात जाऊन अटक केली. त्याच्याविरुध्द भारतीय हत्यार कायदा,विवाहितेचा छळ करणे,नरबळी व इतर अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा आणि जादूटोणा करणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणातील अन्य आरोपी सासरे श्रीराम शेंबटवार,सासू पुष्पा शेंबटवार, दिर अमोल शेंबटवार यांच्याविरुध्द देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

सावधान..! ऑनलाईन गेमिंगचा नाद ठरू शकतो जीवघेणा.. – गेमिंगमध्ये पैसे गमावल्याने आर्थिक विवंचनेत असलेल्या तरुणाने घेतला गळफास..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-आजच्या घडीला जवळपास ९९ टक्के लोकांकडे स्मार्टफोन असल्याने यातील अनेकजण चालता-बोलता कनेक्ट होण्यासह पैसे कमावण्याचे मार्ग शोधतांना दिसून येतात.त्यातच,काहीजण पैसे कमाविण्याचा सोपा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!