Tuesday, May 19, 2026
Homeगडचिरोलीनेहरु युवा केंद्र गडचिरोली तर्फे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज मागवणे सुरू...

नेहरु युवा केंद्र गडचिरोली तर्फे राष्ट्रीय युवा स्वयंसेवक पदासाठी अर्ज मागवणे सुरू – उमेदवार किमान १० वी पास असावा; ५,००० रुपये प्रति महिना मानधन…- अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- भारत सरकार युवक,युवतींना स्वयंसेवक म्हणून संधी देणार असून त्यांची ऊर्जा आणि क्षमता राष्ट्र उभारणीच्या कार्यासाठी महत्वाची असल्याने युवक,युवतींसाठी अनेक उपक्रम राबवित आहेत.अशाच प्रकारचा उपक्रम राबवून स्वयंसेवक म्हणून युवकांना सामाजिक क्षेत्रात;जसे,आरोग्य, स्वच्छता, साक्षरता,लिंग समानता आणि इतर सामाजिक समस्याबद्दल मोहीमा व जागरूकता विषयी कार्यक्रमाचे नेतृत्व करण्यास सांगितले जाणार  आणि आपत्कालीन परिस्थितीत किंवा विविध कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाला मदत करण्यासाठी देखील बोलाविले जाणार आहे.

लागणारी पात्रता

उमेदवार किमान १० उत्तीर्ण व गडचिरोली जिल्ह्यातील रहिवासी असावा. १ एप्रिल २०२३ रोजी वय १८ ते २९ दरम्यान असावे.नियमित विद्यार्थी तसेच इतरत्र नोकरी करणारे अपात्र राहतील.मानधन- ५०००/- प्रति महिना.सदर उपक्रम सशुल्क रोजगार नाही किंवा स्वयंसेवकाला सरकारकडे नोकरीचा दावा करता येणार नाही.सदरील भरती ही दोन वर्षासाठी राहील.अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज ऑनलाईन स्वीकारले जातील.त्यासाठी विभागाच्या www.Nyks.nic.in या वेबसाईट वर फॉर्म भरावा. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ मार्च २०२३ असून अधिक माहितीकरिता कार्यालयीन वेळेत (१० ते ५ ) नेहरू युवा केंद्र गडचिरोल जिल्हा कार्यालय,साईनाथ मेडिकल स्टोअर च्या मागे,रिलायन्स पेट्रोल पंप जवळ, चंद्रपूर रोड,गडचिरोली येथे,email-qnykgadchiroli @gmail.com ०७१३२-२९५०८९ किंवा ९२३०९१६५२३, ९४२२६८५१५४ या क्रमांकावर संपर्क करावा;असे आवाहन अमित पुंडे जिल्हा युवा अधिकारी गडचिरोली यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वऱ्हाडांवर काळाचा घाला; ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात १३ जण ठार.

उद्रेक न्युज वृत्त :-साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडांवर काळाने झडप घातल्याची घटना आज, सोमवार १८ मे रोजी दुपारच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गावर घडली.ट्रक आणि कंटेनरच्या भीषण...

औषध विक्रेत्यांच्या बंदच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क; तालुकानिहाय संपर्क क्रमांक जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-ऑल इंडिया ऑरगनायझेशन ऑफ केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट या संघटनेने देशभरातील ऑनलाईन इंटरनेट फार्मसीच्या विरोधात येत्या,बुधवार २० मे २०२६ रोजी संपूर्ण भारतभर...

येत्या गुरुवारी भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा; आपली मते,तक्रारी व संबंधित बाबी थेट समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील नागरिकांच्या भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारींची दखल घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची सभा येत्या,गुरुवार २१ मे २०२६ रोजी सकाळी ११...

वाढत्या महागाईचा परिणाम; आता एसटी बसच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात वाढ होत असतांना एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या तिकीट दरातही वाढ होण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!