Friday, July 31, 2026
Homeगडचिरोलीनिवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आपसी समन्वयातून काम करा…-अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे

निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी आपसी समन्वयातून काम करा…-अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघात गडचिरोली,चंद्रपूर व गोंदिया या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे.या तीन जिल्ह्यातील संबंधीत निवडणूक अधिकाऱ्यांनी आपसी समन्वयाने काम करून ही लोकसभा निवडणूक शांततेत व निष्पक्षपणे पार पाडण्यासाठी पूर्ण प्रयत्न करावे; अशा सूचना अतिरिक्त विभागीय आयुक्त माधवी खोडे यांनी आज दिल्या.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नोडल अधिकाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा श्रीमती माधवी खोडे यांनी आज घेतला.यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक निलोत्पल,अतिरिक्त जिल्हाधिकारी विजय भाकरे,उपजिल्हा निवडणूक अधिकारी विवेक घोडके,निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल सुर्यवंशी  तसेच दूरदृष्य प्रणालीद्वारे चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील जिल्हाधिकारी,जिल्हा पोलिस अधीक्षक, आणि गडचिरोली-चिमुर लोकसभा मतदार संघातील सहायक निवडणूक अधिकारी व नोडल अधिकारी उपस्थित होते.

भारत निवडणूक आयोगाच्या नियमावलीप्रमाणे मतदानपूर्व ७२ तास, ४८ तास व २४ तासात करावयाच्या कार्यवाहीबाबत श्रीमती खोडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले.निवडणूक प्रचार संपल्यावर राजकीय प्रचाराचे बॅनर काढणे,वाहनाची परवानगी व इतर आवश्यक बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे त्यांनी सांगितले.महिला, दिव्यांग व युवा मतदान केंद्रासह सर्वच मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात कसूर करू नये.मतदान अधिकाऱ्यांजवळ पुरेसा औषधसाठा उपलब्ध करून द्यावा; तसेच त्याचा वापर कसा करावा याबाबतही त्यांना सूचना द्याव्यात.मतदान अधिकारी व निवडणूक कर्तव्यावरील कर्मचाऱ्यांना निवडणूक कामकाज भत्ता वेळेवेर मिळावा.मतदान कालावधीत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर आरोग्य सुविधा उपलब्ध असाव्या याबाबत दक्षता घेण्याचे त्यांनी सांगितले.बैठकीला संबंधीत नोडल अधिकारी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रेल्वेच्या धडकेत दोन सख्ख्या भावांचा  दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील मालेगाव टाऊन परिसरात आज,गुरुवार ३० जुलै रोजी सकाळच्या...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे २५ मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नुकतेच दोन दिवसांपूर्वी नागपूरच्या  प्रादेशिक हवामान खात्याने गडचिरोली जिल्ह्यासाठी काल,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट,तर आज गुरुवारसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार,जिल्ह्याच्या...

लाखो रुपयांचा विदेशी दारूसाठा जप्त; कार ठेवून पळाला आरोपी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या कारचा पाठलाग करण्यात आला.दरम्यान,चालकाने पोलिसांना चकमा देण्याचा प्रयत्न केला खरी,पण त्याचा प्रयत्न...

ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी; …अन्यथा एसटी बसची मिळणारी सवलत होणार बंद..!

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड(NCMC)अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार,येत्या शनिवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!