Wednesday, June 24, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री मासिक कविता स्पर्धेतील द्वितीय सत्राचा निकाल जाहीर... - द्वितीय सत्रात राजरत्न...

नाट्यश्री मासिक कविता स्पर्धेतील द्वितीय सत्राचा निकाल जाहीर… – द्वितीय सत्रात राजरत्न पेटकर,सुनील बावणे व रेखा बोरकर विजयी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने मासिक उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे. त्यानुसार दर महिन्याला ही स्पर्धा विनाशुल्क घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत कवींना दिलेल्या विषयांवर कविता सादर करायची असून या कवितांमधून तीन उत्कृष्ट कवितांची निवड करण्यात येते.या कवितांना मासिक उत्कृष्ट कविता व कवीला उत्कृष्ट कवी म्हणून प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाने पुरस्कृत करण्यात येते.कविता संवर्धन व वाचनसंस्कृती जोपासणे हा स्पर्धेमागचा उद्देश असल्याने पुरस्कृत कवींना पुरस्कार म्हणून पुस्तके व आकर्षक प्रमाणपत्राने नाट्यश्री वार्षिक महोत्सवात मान्यवरांचे गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे द्वितीय सत्र नुकतेच पार पडले असून या सत्राकरीता ‘आषाढ वारी,श्रावण धारा,तसेच सण व उत्सव’, असे तीन विषय देण्यात आले होते.यात ३८ कवींनी सहभाग नोंदवून दिलेल्या तीन विषयांवर एकूण ७९ कविता सादर केल्या होत्या.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून इंदिरानगर (गडचिरोली)येथील राजरत्न पेटकर यांच्या ‘आषाढ वारी’ या विषयावरील ‘विठ्ठला’ या कवितेस प्रथम,बल्लारपूर (चंद्रपूर) येथील प्रसिद्ध कवी सुनील बावणे यांच्या ‘सण व उत्सव’ या विषयावरील ‘सणासुदीचा श्रावण’ या कवितेस द्वितीय व नागपूर येथील कवयित्री सौ.सुरेखा बोरकर यांच्या ‘श्रावणधारा’ या विषयावरील ‘श्रावण सरी’ या कवितेस तृतीय क्रमांकाचे पुरस्कार घोषित करण्यात आले आहे,असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
या स्पर्धेचे परिक्षण प्रसिद्ध समीक्षक प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,प्रसिद्ध कथाकार कवी प्रमोद बोरसरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी केले आहे.कवींच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी, दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्रीच्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या स्पर्धेत प्रामुख्याने संजय कुनघाडकर,खेमदेव हस्ते, अशोक कांबळे,अतुल गंडाटे,रंजना चुधरी,प्रा.कृष्णा कुंभारे,नथ्थुजी चिमुरकर,राजेंद्र सोनटक्के,राजेश बारसागडे,सौ.वैजयंती गहूकर,अहिंसक दहिवले, उकंडराव राऊत,सिध्दार्थ गोवर्धन,रोशनी दाते,विलास जेंगठे,यामिनी मडावी,आत्माराम बर्डे,सुनील शेरकी, ज्योत्स्ना बन्सोड,डॉ.केशनी हटवार,पी.डी.काटकर, सुभाष धाराशिवकर,सुनील बावणे,बाबुलाल राठोड, राजरत्न पेटकर,सोनाली रायपुरे,वंदना मडावी,सुरेश गेडाम,प्रिती चहांदे,सुरेखा बोरकर,शैला चिमड्यालवार, हरिष नैताम,मधुकर दुफारे,मंगला कारेकर,पुरुषोत्तम दहिकर,वंदना सोरते,सुजाता अवचट व प्रा.सरिता बुटले इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील वार्षिक कार्यक्रमात करण्यात येणार असल्याचे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सन-१९९७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी तथा राष्ट्रपती पदक सन्मानित 'धडाकेबाज' अधिकारी ५३ वर्षीय विश्वास नांगरे पाटील आता नागपूरचे नवे पोलिस आयुक्त असणार...

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!