Thursday, October 15, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री' च्या आठवडी कवितास्पर्धेत  प्रा.कृष्णा कुंभारे पुरस्कृत…. 

नाट्यश्री’ च्या आठवडी कवितास्पर्धेत  प्रा.कृष्णा कुंभारे पुरस्कृत…. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने नविन वर्षात “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला  स्पर्धा घेण्यात येणार आहे . 

या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला  कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येवून या कवितेला”आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी” म्हणून पुरस्कृत करण्यात येणार असून पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार आहे. 

उपक्रमाचे पहिले सत्र नुकतेच पार पडले असून यात ३१ कवींनी सहभाग नोंदविला होता.स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून वरुड,जिल्हा- अमरावती येथील प्रा.कृष्णा कुंभारे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “ती” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे. असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

कवी प्रा.कृष्णा कुंभारे हे ज्येष्ठ कवी असून शंकरराव चव्हाण कनिष्ठ महाविद्यालय,खापरखेडा येथून उपप्राचार्य म्हणून सेवानिवृत्त झाले आहेत.त्यांचा ‘अक्षरशिल्प’ हा कवितासंग्रह प्रकाशित असून सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पहिल्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने संजय कुनघाडकर,उपेंद्र रोहनकर,पी.डी.काटकर,स्वप्नील बांबोळे,प्रभाकर दुर्गे, पुरुषोत्तम लेनगुरे,हरिष नैताम, सुनील मंगर,सुनीता तागवान,गजानन गेडाम,रामराज करकाडे, चरणदास वैरागडे, तुळशीराम उंदीरवाडे, मनिषा हिडको, राजरत्न पेटकर, अंगुलीमाल मायाबाई उराडे, भिमानंद मेश्राम,  रुपाली म्हस्के, कृष्णा कुंभारे, प्रब्रम्हानंद मडावी, मिलिंद खोब्रागडे,सिध्दार्थ गोवर्धन, वसंत चापले, ज्योत्स्ना बन्सोड, प्रतीक्षा कोडापे, सुजाता अवजट, प्रिती चहांदे, संदिप आंबोरकर, रविंद्र गेडाम व खुशाल म्हशाखेत्री इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाचन संस्कृतीच्या चळवळीत महात्मा गांधी शाळेचा पुढाकार.. – आज ‘ग्रंथालय आपल्या दारी’ उपक्रमाचा दिमाखात शुभारंभ; वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ज्ञानसमृद्ध,वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली आणि स्पर्धा परीक्षांसाठी सज्ज अशी पिढी घडविण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक...

संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण विभाग सज्ज.. – “पाणी अडवा,पाणी जिरवा”चे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-'एल निनो'च्या प्रभावामुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून गडचिरोली जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी मृद व जलसंधारण...

दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा; दिवाळीपूर्वी मिळणार पाच हजार रूपयांची मदत..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-महाराष्ट्र राज्य सरकारने दुष्काळग्रस्त यादीत ४० नवीन तालुक्यांचा समावेश केल्यामुळे ३५८ पैकी एकूण ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.अश्यातच खरीप...

आता राज्यातील ३०५ तालुके अंतिमतः दुष्काळी तालुके म्हणून घोषित.. – आणखी ४० तालुक्यांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त :-राज्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता राज्य सरकारने दुष्काळग्रस्त तालुक्यांबाबत महत्त्वाची घोषणा केली आहे.यापूर्वी ट्रिगर-१(प्रथम कळ)अंतर्गत २६५ तालुके दुष्काळी तालुके म्हणून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!