Sunday, October 25, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेत नवोदित कवयित्रींची बाजी….-पाचव्या सत्रात कवयित्री 'प्रतिभा सुर्याराव' विजयी… 

नाट्यश्री कविता स्पर्धेत नवोदित कवयित्रींची बाजी….-पाचव्या सत्रात कवयित्री ‘प्रतिभा सुर्याराव’ विजयी… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली’ च्या वतीने नविन वर्षात “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.या उपक्रमाचे पाचवे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३२ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून अंबरनाथ (जिल्हा ठाणे) येथील  कवयित्री प्रतिभा प्रविण सुर्याराव यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “डोळे भरून आले तरी” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्री चे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे,कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

सौ.प्रतिभा सुर्याराव या नवोदित कवयित्री असून त्या अंबरनाथ (पुर्व) जिल्हा- ठाणे येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी विविध विषयांवर कवितांचे लेखन केले असून विविध स्पर्धातून त्यांना राज्यस्तरीय काव्यरत्न व काव्यगौरव पुरस्कार प्राप्त झाले आहेत.सातत्याने कवितालेखनाचे कार्य करीत आहे.त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी, दिलीप मेश्राम, प्रा. यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.या पाचव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने  पुरुषोत्तम लेनगुरे, लीना देगलूरकर,सुनील मंगर,कु.तनुजा भोयर,प्रभाकर दुर्गे, हरिष नैताम,जितू निलेकार,प्रशांत गणवीर,संगीता रामटेके, मुर्लीधर खोटेले,अनुराग मुळे,प्रतिभा सुर्यराव, कृष्णा कुंभारे, पी.डी.काटकर,ज्योत्स्ना बन्सोड, बाबाजी व्ही.हुले, प्रब्रम्हानंद मडावी, अंगुलीमाल मायाबाई उराडे, वंदना मडावी, प्रेमिला अलोने, मनोहर दुधबावरे,तुळशीराम उंदीरवाडे, संजय बन्सल, सत्तू भांडेकर,चरणदास वैरागडे, संगीता ठलाल,उपेंद्र रोहनकर, राजरत्न पेटकर, मिलिंद खोब्रागडे, प्रिती चहांदे, सुजाता अवचट, लता शेंद्रे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!