उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-गेल्या १० ते १२ दिवसांपासून गडचिरोली,चंद्रपूर,भं डारा,गोंदिया,नागपूरसह इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पावसाने थैमान घातले होते.सर्वत्र नदी,नाले,डबके व इतर ठिकाणी पाणी साचले.त्यामुळे जागोजागी साचलेल्या पावसाचे पाणी आणि ढगाळ वातावरणात वाढत असलेल्या डासांच्या उच्छादामुळे मुळे डेंग्यू, मलेरिया,चिकनगुनियासारख्या आजारांचा उद्रेक सुरू झाला आहे. सोबतच डायरियाच्या साथीनेही त्यात भर घातल्याने घरोघरी किमान एकाने खाट धरल्याची परिस्थिती आहे.नागपूर
विभागात सध्या डेंग्यूच्या डासांचा उद्रेक असून नागपूर आणि चंद्रपुरात या आजाराने कहर केला आहे. एकट्या नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचे १४८ तर चंद्रपूर जिल्ह्यात १४७ रुग्णांची नोंद आरोग्य विभागाने घेतली आहे.खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्यांचा यात समावेशच नसून ही संख्या त्याहून अधिक असण्याची भीती व्यक्त होत आहे.धक्कादायक बाब म्हणजे नागपूर ग्रामीण भागातील १४८ आणि मनपाच्या हद्दीत ३९ असे नागपूर जिल्ह्यात डेंग्यूचे सर्वाधिक १८७ रुग्ण आहेत.तर त्याखालोखाल चंद्रपूर ग्रामीण भागातील १४७ आणि मनपा हद्दतील २८ असे १७५ रुग्ण आढळले आहेत.
नागपूर विभागात आतापर्यंत ५५३ जणांना डेंग्यूची लागण झाल्याचे आरोग्य विभागाने केलेल्या पाहणीतून स्पष्ट झाले आहे.एकट्या नागपूर मनपाच्या हद्दीत डेंग्यू रुग्ण संख्या ३९ वर पोचली आहे.नागपूर शहरापाठोपाठ वर्धेत ६७, गडचिरोली जिल्ह्यात ६४, गोंदियात ५१,चंद्रपूर शहरात २८ आणि भंडारा जिल्ह्यात ९ जणांच्या डेंग्यू चाचण्या पॉझिटिव्ह आढळल्या आहेत.

